का ल द र्श क

Thursday, 11 September 2014

अपवादात्मक अपवाद

भारतीय समाजाने येथील मानवांची अलिखित आणि अनौपचारिक वर्गवारी केलेली आहे.  या वर्गवारीनुसार पुरुषांनी कसं वागावं, महिलांनी कसं वागावं, याचे काही एक नियम ठरून गेले आहेत.  महिला आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या शारीरिक भेदांशिवाय त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेतील फरकदेखील समाजाने ठरवून टाकला आहे.  या आखणीनुसार महिला व पुरुषांची कार्यक्षेत्रेही ठरली आहेत.  त्यानुसार ढोबळ मानाने घराच्या आतले कार्यक्षेत्र हे महिलांचे आणि घराबाहेरचे कार्यक्षेत्र ही विभागणी तर फारच जुनी आहे.  परंतु या नियमांना अपवाद म्हणून काही महिला या घराबाहेर देखील कार्यरत राहतील हे समाजाने मान्य केले आहे.  या अपवादांची देखील समाजाने पुन्हा वर्गवारी केली आहे.  त्यानुसार आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय महिला या घरकाम अथवा लघु उद्योगातील कामगार म्हणून कार्यरत राहतील असे ठरले आहे.  प्लंबर, सुतार, लोहार (वेल्डर / फॅब्रिकेटर), रेल्वे स्थानकावरील हमाल, वाहन / मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती कारागीर या खास पुरुष राखीव जागांवर चुकूनही महिला दिसणार नाहीत.  मुद्रण उद्योगात (छापखान्यात) महिला आहेत पण त्या कुठे? तर यंत्रावर पुरुषांनी मुद्रणाचे मुख्य काम केल्यावर मुद्रित कागदाच्या घड्या घालणे, पुस्तके चिटकविणे अशा कमी जोखमीच्या आणि अर्थातच कमी मोबदल्याच्या कामावर.  वर्तमानपत्र विक्रीतही घरोघरी दुचाकीवरून वर्तमानपत्रे पोचविण्याचे काम पुरुषांचे तर महिलांचे काम दुकानात एका जागी बसून विक्री करण्यापुरतेच मर्यादित.  रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचे चालक देखील पुरुषच.  टॅक्सीचालक म्हणून आता काही प्रमाणात महिला पुढे येताहेत पण त्या देखील प्रियदर्शिनी सारख्या संस्थेच्या माध्यमातून, स्वतंत्र पणे नव्हे.  शिवाय त्यांचे प्रमाण देखील अत्यल्पच आहे.  खासगी वाहनांचे चालक या पदावरही अजूनही पुरुषांचेच साम्राज्य आहे.   

 आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय महिलांचे प्राधान्य अध्यापन, कला, सेवा क्षेत्रात राहील हे गृहीत धरले जाते.   उद्योग, अभियांत्रिकी, वैद्यकीय अर्थ, गुंतवणूक या क्षेत्रात जर महिला असल्याच तर त्यांच्यावर प्रामुख्याने कमी जबाबदारीचे अथवा दुय्यम श्रेणीचे काम राहील हे पाहिले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर कार्यालयात पुरुष व्यवस्थापक तर महिला स्वागतिका, विमान सेवेत पुरुष वैमानिक तर महिला हवाई स्वागतिका, इस्पितळात पुरुष शल्य विशारद तर महिला परिचारिका अशा प्रकारे भूमिकांचे वाटप झाले आहे. 

उच्च आर्थिक गटातील महिलांची परिस्थिती काय आहे?  विविध उद्योगसंस्थांच्या मालक, संचालक या पदांवर महिला दिसतील.  राजकारणातही काही मोजक्या उच्च पदांवर महिला आहेत.  पण त्या तिथे का आहेत?  तर त्या एखाद्या घराण्याशी संबंधित आहेत म्हणून.  जसे की, कायनेटिक उद्योगसमूहाचे मालक श्री. अरुण फिरोदिया यांच्या कन्या सुलज्जा फिरोदिया-मोटवाणी.  पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी इत्यादी.   जर सुलज्जा व इंदिरा यांना सख्खे बंधू असते तर त्या आपल्या पित्याच्या वारसदार ठरल्या असत्या काय?  २०१४ लोकसभा निवडणूकीत मुंबईमध्ये एक अपवादात्मक चित्र दिसले.  सुनील दत्त व प्रमोद महाजन या दिवंगत राजकारण्यांच्या कन्या प्रिया व पूनम एकमेकींच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवीत होत्या.  या घटनेत या दोघींनाही सख्खे भाऊ असतानादेखील आपापल्या पित्याचा वारसा या दोन्ही कन्यांकडे आला.  अर्थात या दोघींचे बंधू संजय दत्त व राहुल महाजन वैयक्तिक कारणांमुळे ही निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्यानेच या दोघींना ही संधी मिळाली. 

अर्थात या सर्व व्यवस्थेला आव्हान देत अनेक मध्यम व उच्च मध्यम आर्थिक गटातील महिलांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मोठमोठी पदे मिळविली आहेत.  तसेच उच्च आर्थिक गटात (कॉर्पोरेट विश्व) इंद्रा नूयी, चंदा कोचर अशा महिलांनी आपले स्थान पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर आणले आहे.  इतके असले तरीही अजून लिमिटेड कंपन्यांपैकी ५५ टक्के कंपन्यांमध्ये (किमान एकतरी महिला संचालक नेमणे कायद्याने बंधनकारक असूनही) एकही महिला संचालक नाही ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.   शिवाय मोठ्या पदांवर असणाऱ्या व संख्येने अत्यल्प अशा महिला या त्या ठिकाणी अपवादानेच आहेत हे देखील विविध नियतकालिकांतून लेखांद्वारे सातत्याने लोकांसमोर मांडण्यात येते जेणेकरून महिलांचे अशा स्थानी असणे सहजसाध्य नाही तर अतिशय जिकिरीचे आहे हे इतर महिलामनांवर बिंबविले जावे. 

कला विश्वातले महिलांचे स्थान काय आहे?  चित्रपट, नाट्य ही क्षेत्रे समाजाचा आरसा आहेत.  त्यामुळे अर्थातच त्यांच्या कथांमध्ये महिला व पुरुष पात्रांचे प्रमाण सारखेच असणार.  त्यामुळे अभिनय व गायन क्षेत्रात महिला व पुरुष यांचे प्रमाण सारखेच असणे नैसर्गिक आहे.  (अर्थात पूर्वीच्या काळी महिलांच्या भूमिका देखील पुरुषच करीत, त्यामुळे तिथेही महिलांचे प्रमाण कमीच होते पण आता ती परिस्थिती राहिली नाही. )  गायक व गायिकांचे आणि अभिनेते व अभिनेत्रींचे संख्यात्मक प्रमाण सारखे असले तरीही त्यांच्या दर्जात्मक प्रमाणातला फरक लक्षणीय आहे.  अभिनेत्यांची कारकीर्द तुलनेने प्रदीर्घ व आव्हानात्मक आहे तर अभिनेत्रींची कारकीर्द अल्प स्वल्प तसेच अभिनयाला फारसा वाव नसणारी आहे.  त्यांच्या मानधनातला फरकही लक्षणीय आहे.  गायक व गायिकांमध्ये असा फरक दिसून येत नाही.  किंबहुना तिथे प्रकार उलटाच आहे.    १९८० साली वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मोहम्मद रफी आणि १९८७ साली वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किशोर कुमारांचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता आणि आघाडीच्या गायिका लता व आशा या तुलनेने दीर्घायुषी ठरल्या आहेत हे पाहता गायक व गायिकांची कारकीर्दीची तुलना करणे थोडे किचकट असले तरीही हे लक्षात घ्यावे लागेलच की आशा व लता या दोघींनी कुठल्याही पुरुष गायकापेक्षा अफाट संख्येने गाणी गायली आहेत.  या दोघींच्या जास्त गाण्यांमुळेही पुन्हा महिला पुरुष असमानताच सिद्ध होते आणि तीदेखील गायनक्षेत्रातली नव्हे तर अभिनय क्षेत्रातली.  लता व आशा यांना पुरुष गायकांपेक्षा जास्त गाणी मिळण्याचे कारण -
  1. चित्रपटात नायिकेलाच नाचगाण्याला जास्त वाव असतो. नायक तुलनेने महत्त्वाचे असे म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, बौद्धिक कसोटी यात व्यग्र असतो.
  2. नायिका कुणीही असली तरीही तिला कुठलाही कॉमन आवाज चालतो.  फार तर सोज्वळ गाण्यांकरिता लता आणि कॅब्रे, इत्यादी बोल्ड गाण्यांकरिता आशा अशी विभागणी पुरेशी आहे हा चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोन.  याउलट नायक कोण आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज काय आहे? हे नीट विचारात घेऊन त्यानुसार त्याकरिता गायकाचे नियोजन.  जसे की देव आनंद व राजेश खन्ना करिता किशोर कुमार, दिलीपकुमार व शम्मी कपूर करिता मोहम्मद रफी,  राज कपूर व मनोज कुमार करिता मुकेश ही विभागणी पुरुष गायकांना कमी काम मिळवून देणारी असली तरीही पुरुष अभिनेत्यांचे महत्त्व वाढविणारीच ठरते नाही काय?
याशिवाय कला प्रांतातील महिलांच्या बाबतीत असणारे विविध प्रवाद.  त्या स्वतःच्या क्षमतेवर किती आणि पुरुषांचा शिडी सारखा वापर करून किती वरपर्यंत चढल्यात याबाबत चर्चिले जाणारे किस्से.  या व्यवस्थेलाही तोंड देत एखादी महिला अगदी उघडपणे व निःसंशय स्वतःच्या मेहनतीच्याच जोरावर यशशिखरावर विराजमान झाली असेल आणि उणीव दाखवावी असे तिच्यात शोधूनही सापडण्यासारखे दूरान्वयानेही काही नसेल तर तिला लगेच  वेगळ्याच कोंदणात बसविले जाते.  मग ती सर्वांचीच ताई, माई, अक्का असल्याचा तिच्यावर शिक्का बसतो.  ती कोणाची प्रेयसी, कोणाची मैत्रीण देखील होऊ शकत नाही.  एका वेगळ्याच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले जाते.  याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर.  त्यांच्या पिढीतील, पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीतील सर्वच जण त्यांचा दीदी म्हणूनच उल्लेख करतात.  त्यामुळेच जेव्हा त्यांच्या एका वाढदिवसाच्या जाहीर समारंभात सोनू निगमने "मी थोडा आधी जन्माला आलो असतो किंवा लताजी थोड्या उशीराने जन्माला आल्या असत्या तर मी त्यांना विवाहाकरिता मागणी घातली असती." असे विधान केले तेव्हा ते अनेकांना खटकले.  सोनू निगमांवर टीकाही झाली.  खरे पाहता सोनूने लताजींकडे पाहण्याच्या समाजाच्या चाकोरीबद्ध नजरेची कोंडी फोडली असेच म्हणावे लागेल.  परंतु आपल्या समाजाने अपवादांचीही वर्गवारी केली असल्याने सोनूचे विधान समाजाच्या पचनी पडले नाहीच.  

अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी.  महिला शक्यतो घरातच राहणार.  घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच.  म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता.  कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच.  त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर.  पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही.  [काव्यात्म न्याय / योगायोग म्हणजे उपग्रह वाहिनीवरील मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या कृत्तिका सेनगर हिनेच पुढे पुनर्विवाह या मालिकेत महिलेच्या पुनर्विवाहाचा मुद्दाही ऐरणीवर आणण्यात मुख्य भूमिका निभावली.]  असो. तर झाशीच्या राणीचे शौर्य हे अपवादच होते असे समजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे पुरावे म्हणजे झाशीच्या राणीच्या इतिहासोत्तर काळात जन्माला आलेल्या मुलींनाही घोडसवारीचे प्रशिक्षण दिले जात नसे.  अगदी त्यापुढील काळातही किती जणी सायकली अथवा स्वयंचलित दुचाकी चालवीत असत?  सुनीताबाई देशपांडे चारचाकी मोटार चालवीत आणि भाई चालकाच्या बाजूला बसत.  एकदा सुनीताबाई रस्त्याने अशाच गाडी चालवीत असताना दोन मुले रस्त्यात दिसली.  त्यातल्या एकाने दुसऱ्याला सांगितले - अरे बाई गाडी चालवतीये, बाजूला हो नाहीतर अपघातात सापडशील.  त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला - काळजी करू नकोस शेजारी बाप्या बसलाय ना. तोच काळजी घेईल अपघात होणार नाही याची.  आयुष्यात कधीही वाहनाचे सुकाणूचक्र न धरलेल्या भाईच्या केवळ शेजारी असल्यामुळे रस्त्यावरील मुलांना हायसे वाटावे आणि त्यापुढे सुनीताबाईंच्या वाहन चालविण्याच्या अफाट कौशल्याचा काडीचाही प्रभाव पडू नये याचे सुनीताबाईंना मोठे वैषम्य वाटले.  पण सामाजिक वर्गवारीने पुरुष व महिलांची कार्यक्षेत्रे ठरविली त्याला सुनीताबाई किंवा रस्त्यावरची ती मुले तरी काय करणार? 

पुढे महिला दुचाकी वाहने चालवू लागल्या तरी कोणती? तर स्कूटर किंवा मोपेड यांसारखी.  एखादी महिला मोटरबाईकसारखे वाहन चालविते असे सत्तर ऐंशीच्या दशकांतील चित्रपटांतून दाखवायला सुरुवात झाली.  अशी वाहने चालविणारी महिला पुरुषांसारखे पँट शर्ट असा पोशाख, पुरुषांप्रमाणेच अगदी लहान कापलेले केस अशी टॉमबॉय स्वरूपात दाखविली जाऊ लागली.  म्हणजे तिला काही वेगळे करायचे तर तिला महिलांच्या नेहमीच्या गटातून बाहेर काढून तिचे छंद हे अपवादात्मक आहेत असे दाखवूनच.     ही झाली समाजाच्या अपवादांचीही वर्गवारी करावयाच्या मानसिकतेची पद्धत.  म्हणजे महिला अमुक एक वाहन प्रकार चालविणार नाहीत आणि समजा एखादीने चालविलेच तर ती लगेच टॉमबॉय कॅटेगरीतली.  

पुरुषांप्रमाणे वाहन प्रमाणे वाहन चालविले, किंवा तसे कपडे घातले, किंवा तसे केस ठेवले तर ती महिला पुरुषी वृत्तीची ठरते काय?  तिच्यातील स्त्री-सुलभ भावना लोप पावतात काय?  अजिबात नाही.  आणि हे समाजाला दाखवून दिले पुरुषांसारखे कपडे घालणाऱ्या, बारीक केस ठेवणाऱ्या आणि बरीचशी त्यागराज खाडिलकरांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या गायिका फाल्गुनी पाठकने.  तिची सर्व गाणी पाहा आणि ऐका.  प्रत्येक गाण्याचे बोल आणि सादरीकरण स्त्री-सुलभ भावनांचे यथार्थ प्रदर्शन मांडणारे आहे हे लगेच जाणवेल.   आता तर अनेक महिला टिपीकल महिला वेषात आणि केशभूषेत राहून देखील खास पुरुषांची समजली जाणारी बुलेट सारखी वाहने देखील चालवीत आहेत.  महिलांकडून आता अपवादांच्या वर्गवारीलाही आव्हान दिले जाण्यास सुरुवात झाली आहे. 

मनोरंजन क्षेत्रात गायन, अभिनय अशा विभागांमध्ये महिलांची आवश्यकता असल्याने महिलांना स्थान आहे पण लेखन / दिग्दर्शन /संगीत दिग्दर्शन या विभागांत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे.  अपवाद म्हणून काही महिला या क्षेत्रात आहेत.  त्यातही दिग्दर्शन हा प्रांत अतिशय विद्वत्तेचा समजला जातो त्यामुळे या प्रांतातील महिला अपवादाच्या वर्गवारीप्रमाणे अतिशय अभ्यासू, विद्वान आणि महत्त्वाचे म्हणजे धीरगंभीर स्वभावाच्या हे ठरून गेल्यासारखे आहे.  सई परांजपें ह्या अपवादाच्या परंपरेतला एक अपवादात्मक अपवाद.  त्यांनी गंभीर चित्रपटांबरोबरच निखळ विनोदी चित्रपट देखील बनविले.  परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली. 

अशा वेळी मनोरंजन विश्वाच्या क्षितिजावर उदय झाला फराह खानचा.  ह्या दिग्दर्शिकेने पहिल्याच प्रयत्नात (मै हूं ना - २००४) प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला भाग पाडलं.   विनोदासोबतच चित्रपटात देशभक्ती, प्रेम, शौर्य हे सर्व रस मिसळून एक चांगला मसालापट बनविला, त्याला उत्तम व्यावसायिक यश देखील मिळालं आणि समीक्षकांची प्रशंसाही.  मुख्य म्हणजे शाहरुख सारख्या मनस्वी कलाकाराला लीलया हाताळलं.  महिला अष्टपैलू नसतात किंवा अनेक आघाड्यांवर त्या एकाच वेळी कार्यरत राहू शकत नाहीत या पारंपरिक समजालाही तिने छेद दिला.  मूळची ती तशी दिग्दर्शिका नव्हेच. पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नापूर्वी तिने जलवा, सात साल बाद (१९८७), कुछ कुछ होता है (१९९८) आणि कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधून किरकोळ भूमिका केल्या होत्या.    त्याशिवाय १९९२ च्या जो जीता वही सिकंदर पासून २००३ च्या चलते चलते पर्यंत तिने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले.  २००४ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावरही तिने आपले हे जुने काम सोडले नाहीच.  अजूनही ती पाहुणी अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करतेच.  शिवाय पटकथा लेखन आणि निर्मिती ह्या जबाबदाऱ्याही तिने पार पाडल्या आहेत.  इतकेच नव्हे तर शिरीन फरहाद की तो निकल पडी या चित्रपटाद्वारे तिने पूर्ण लांबीची नायिकेची भूमिकाही निभावली आहे.  तेही वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी आणि पारंपरिक नायिकेला शोभेल अशी शरीरयष्टी नसतानाही. 

त्याशिवाय आपल्या दिग्दर्शकीय आणि नृत्यदिग्दर्शकीय कौशल्यातून इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सर्वात आधी साध्य करून दाखविली.  कत्रिना कैफने पदार्पणातच (बूम - २००३) बिकिनी दृश्य दिले.  इतर अनेक चित्रपटांतूनही तिने देहप्रदर्शनाचा अजिबात संकोच केला नाही.  परंतु इतके करूनही ती कधी 'मादक' किंवा 'चालू' दिसू शकली नाही.  याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव.  अगदी अक्षय कुमार सोबतच्या नमस्ते लंडनमध्ये तिच्या संवादांमुळे ती भांडकुदळ किंवा उर्मट वाटली असली तरीही तिला 'चालू' दाखविणे कुठल्याच दिग्दर्शकाला जमले नव्हते.  परंतु ही बाब जणू एक आव्हानच आहे असे समजून फराह खानने तिला तीस मार खान चित्रपटात शीला की जवानी या गाण्यातून 'मादक' किंवा 'चालू' रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले.  या गीतात कत्रिनाच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे निरागस भाव पार पुसले गेलेले आढळतात.  आता हे फराहने योग्य केले की अयोग्य हा वादाचा मुद्दा असला तरीही इतर कुणालाही साध्य न होऊ शकलेली गोष्ट तिने सहज करून दाखविली हे मान्य करावेच लागते.      

इतक्या आघाड्या सांभाळणारी ही बुद्धिमान महिला अपवादात्मक असली तरी इतर अपवादात्मक महिलांप्रमाणे हिचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तेच्या ओझ्याखाली धीरगंभीर बनले आहे असे मात्र अजिबात नाही.  अतिशय हसतमुख व विनोदी व्यक्तिमत्त्वाची ही महिला डान्स इंडिया डान्स, जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या व अशा इतर कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर येते, स्पर्धकांशी दिलखुलास संवाद (तेही अगदी थेट बंबईय्या हिंदीतून) साधते तेव्हा कुणी सेलिब्रेटी न वाटता आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती वाटते.  

व्यक्तिगत आयुष्यात देखील या महिलेने अनेक परंपरांना छेद दिला आहे.  सहसा महिला आपला वैवाहिक जोडीदार शोधताना वय व शारीरिक क्षमता यांत आपल्यापेक्षा वरचढ पुरुषास पसंती देतात.  तसेच मुस्लिम महिला सहसा गैर मुस्लिम पुरुषांना पसंती देत नाहीत.  परंतु इथेही सर्व परंपरांना छेद देत फराहने आपल्यापेक्षा तब्बल साडेआठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदेर सोबत विवाह केला.  चाळिशीनंतर महिलांचा मातृत्व टाळण्याकडे महिलांचा कल असतो.  इथेही पुन्हा अपवाद करीत फराहने वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी ही संधी घेतली आणि निसर्गानेही तिला अपवादांची मालिका प्रवाहित ठेवण्यास साहाय्य करीत एक पुत्र (झार) व दोन कन्या (दिवा आणि अन्या) या तिळ्यांची आई बनविले.  

फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत.  द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला.  हे भल्याभल्यांना जमत नाही.  पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा?  मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि  तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे.  देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता.  अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील.  परंतु यश चोप्रांनी जेव्हा त्यांचा लम्हे हा चित्रपट अपयशी ठरला आणि तो काळाच्या पुढचा असल्याचा दावा केला तेव्हा त्यात काही तथ्य नव्हते कारण याच कथेवर पूर्वी गुलजार यांनी मौसम हा एक यशस्वी चित्रपट बनवून दाखविला होता.  असो.  तर असे हे द्रष्टेपण समाजात अभावानेच आढळणारे.  फराह खान मध्ये ही भविष्याचा वेध घेणारी कला दिसून आली ती २००९ मध्ये जेव्हा तिने तेरे मेरे बीच में नावाचा एक सेलिब्रिटी रिअलिटी शो स्टार प्लस या उपग्रह वाहिनीवर सादर केला.  तेरा भागांच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण तेव्हा ही संकल्पना नवीन होती.   आता मात्र अशी संकल्पना रुळली आहे.  अनुपम खेर देखील असा एक कार्यक्रम आता सादर करतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.  तर फराह च्या कार्यक्रमात तिने दुसऱ्याच भागात मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना निमंत्रित केले होते.  त्यात तिने विजेंद्रला अभिनय करण्याविषयी सुचविले होते आणि त्याच्याकडून लहानसा प्रसंग सादरही करून घेतला होता.  त्याचप्रमाणे प्रियांकालाही तिने लुटुपुटूचे बॉक्सिंग करायला लावले होते.  गंमत म्हणजे विजेंद्र सिंग फग्ली या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून प्रेक्षकांपुढे आलाय आणि प्रियंकानेही मेरी कोम वरील चित्रपटात प्रशंसनीय बॉक्सिंग केली आहे.   ह्या भविष्याचा पाच वर्षांपूर्वीच वेध घेणाऱ्या ह्या महिलेला द्रष्टेपण नाही असे म्हणावे तरी कसे?  विकिपीडियावरील माहितीनुसार फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ चा म्हणजे चित्रपटसृष्टीतील तीनही दिग्गज खानांपेक्षा ती वयाने जराशी मोठीच.  तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रेणुका शहाणे या आणि अशा इतर अनेकींची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आलेली असताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही महिला मनोरंजन क्षेत्रात अनेक आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे कार्यरत राहू पाहत आहे.  दिवाळीत तिचा अजून एक भव्य प्रकल्प हॅपी न्यू इयर प्रेक्षकांसमोर सादर होत आहे.  या निमित्ताने तिच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन ह्या लेखाची सांगता करतो.

Saturday, 19 April 2014

मी मतदान का करावे?

लेख पाच वर्षांपूर्वीचा असला तरीही विषय आज देखील तितकाच ताजा आणि परिस्थिती अनुरुप असल्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.  
*************************
१३ ऑक्टोबर २००९ रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूकीत विविध समाजसेवी संस्था, पक्ष संघटना, मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी तर मतदान न करणाऱ्यांची तीव्र शब्दांत निर्भत्सनाच केली आहे. मतदान का करावे या विषयी अनेक मुद्दे मांडण्यात आले. परंतू मतदान न करणारे ते का करत नाहीत या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मीही कधीच मतदान केले नाही व यावेळीह्ी करणार नाहीय. प्रत्येक वेळी माझ्या मतदान न करण्याला संयूक्तिक कारणे होती. परंतू यावेळी मतदान न करणाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात टीका होतेय ते पाहून मी मतदान न करणाऱ्यांपैकीच एक असल्यामूळे मला मतदान न करण्याची कारणे नमूद करावीशी वाटतात. यातील काही कारणे सार्वकालिक आहेत तर काही तात्कालिक.
नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनीै सवंग पणाची पातळी ओलांडली. जे नेते नेहमीच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून आधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलीसांचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने ते परिस्थितीमुळे नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना काय सूचित करायचे आहे? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा साऱ्यांनीच शस्त्रे हाती घ्यावी म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होइल. शिवाय नक्षलवाद्यांशी एकांडया शिलेदाराप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कँाग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दिनांक १२ ऑक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसऱ्या पक्षाला मत देऊन निवडून आणले तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार काय? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजूला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॅकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे आहे काय?
मतदान करणारे मोठया आभिमानाने आपण नुसते मतदान केले म्हणजे फार मोठे नैतिक कर्तव्य केल्याचा आव आणतात. पण मतदान कोणाला आणि का करावे हे पटल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे? या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात? मी या गोष्टींचा अभ्यास केला आहे. त्यात प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची घातला आहे आणि मगच मतदान न करण्याची माझी भूमिका मी निश्चित केली आहे. ‘मी मराठी’ वाहिनीवर परवाच पाहिलेल्या एका चर्चेमुळे तर ही भूमिका आधिकच पक्की झाली. या चर्चेत रिडालोस चे अबू आझमी, कँाग्रेस तर्फे विजय कलंत्री, मनसे च्या वतीने शालिनी ठाकरे, शिवसेने कडून दिवाकर रावते तर भाजपाचे विनोद तावडे यांनी भाग घेतला होता. अबू आझमी यांना मराठी अजिबात समजत नव्हते त्यामूळे त्यांच्याकरिता प्रश्नोत्तरांचा पुन्हा हिंदीत अनुवाद होत होता. विजय कलंत्रींना मराठी कळत होते पण बोलताना धाप लागत होती त्यामूळे ते दोन वाक्यं मराठी तर चार वाक्य हिन्दी बोलत होते. त्यांना मनसे असेही नीट म्हणता येत नव्हते ते सारखे मनसा असा उच्चार करीत होते. ठाकरे आडनाव लावणाऱ्या मनसेच्या शालिनी यांचे मराठी बोलणे आश्चर्यकारकरीत्या अतिशय वाईट होते. त्यांचा गृहपाठही व्यवस्थित झालेला नव्हता. त्या शक्य तितके कमीच बोलत राहून आपल्या अज्ञानावर पांघरूण घालत होत्या. शेवटी एका श्रोत्याच्या प्रश्नाने हे पांघरूण दूर झालेच. त्याने विचारले की मनसे उत्तर भारतीय व बिहारींना मुंबईतून हाकलायच्या गोष्टी करते मग बांग्लादेशीय घुसखोरांविषयी मनसेची भूमिका काय? यावर शालिनी ठाकरेंनी उत्तर भारतीय, बिहारी व बांग्लादेशीय घुसखोर या सगळयांविषयी पक्षाची सारखीच भूमिका असल्याचे सांगितले. या त्यांच्या उत्तरामूळे त्या फारच अडचणीत आल्या कारण अबू आझमींनी त्यांना विचारले की देशाचे नागरिक असणारे उत्तर भारतीय, बिहारी व घुसखोरी करणारे परकीय बांग्लादेशीय यांना एकाच तराजूत तोलणे योग्य आहे काय? पुढे ते शालिनी ठाकरेंना म्हणाले,”मॅडम आपको तो ऐसा कहते हुए शर्म आनी चाहिए क्योंकि आपका तो परिवार उत्तर भारत से आकर यहां बसा हुआ है।”. यावर शालिनी ठाकरेंनी मौनच बाळगले. दिवाकर रावते व विनोद तावडेंचे मराठी वर चांगले प्रभुत्व दिसून आले त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यासही चांगला होता. पण त्यांची आक्रमकता टोकाची होती. त्यांनी चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्या राजू परूळेकरांनाच दलाल म्हणून संबोधले. विनोद तावडेंचे हातवारे करणे इतके अंगावर येत होते की एकदा तर रावतेंनीच त्यांचा हात झटकून बाजूला केला.

याशिवाय मी प्रमुख नेत्यांच्या मुलाखती वृत्तपत्रांत वाचल्या तसेच दूरचित्रवाणीवरही पाहिल्या. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, अजित पवार या तिघांचा अभ्यास चांगला आहे आणि संभाषणकौशल्यही वादातीत आहे. अजित पवार तर मुलाखतीत म्हणाले की आपण स्वतःचा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत आता शेवटचे दोन दिवस प्रचार करणार आहोत. आपण निवडून येणार की नाही ते सांगू शकत नाही. मतदारांना गृहीत न धरण्याची ही आदर्श विनम्रता माझ्या मनाला फारच भावली. ते माझ्या मतदारसंघात उभे असते तर मी निश्चितच त्यांना मतदान केले असते पण त्यांच्या आघाडीने आमच्या मतदारसंघात दिलेले उमेदवार सरळसरळ आपण अमूक इतक्या मताधिक्याने निवडून येऊ असे सांगतात तेव्हा त्यांना मत देण्याची इच्छाच होत नाही. तीच गोष्ट राज व उध्दव ठाकरे यांची. यांनी दिलेल्या उमेदवारांना शुध्द मराठी सुध्दा बोलता येत नाही मग सामाजिक जाणिवांचा अभ्यास ही फारच दूरची गोष्ट. फक्त नेत्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांच्या मठ्ठ उमेदवारांना मत कसे काय द्यायचे? रिडालोसची याच्या अगदी उलट परिस्थिती. त्यांचे स्थानिक उमेदवार चांगले अभ्यासू, लोकांच्या समस्यांची जाण असणारे व उच्चशिक्षीतही आहेत. तरीही,त्यांना मत देण्याचा विचार फारच जाणीवपूर्वक बाजूला सारावा लागतो कारण त्यांना मत देणे म्हणजे पुढे सत्तेचे कोलीत आयतेच रामदास आठवले व अबू आझमी अशा असमंजस व आक्रस्ताळया नेत्यांच्या हाती देणे.

याशिवाय अनेक लहान पक्षांचे तसेच काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांच्याविषयी मला काहीच ठाऊक नाही. काही नावे तर चक्क मतदानकेन्द्रात गेल्यावरच कळतील कारण हे आमच्याकडे प्रचारालाही फिरकले नाहीत. यांनी यापुर्वी काही समाजकार्य केले असल्यास त्याचा तपशील कळणे ही तर फारच दूरची गोष्ट. तसेही विधानसभेच्या मतदारसंघाचा पसारा फारच मोठा असल्याने उमेदवाराला मतदार व्यक्तिगत पातळीवर ओळखत असण्याची शक्यता फारच कमी असते. महापालिकेच्या निवडणूकीत ही शक्यता तूलनेने जास्त असते. तरीही मी महापालिकेच्या निवडणूकीलाही मतदान केले नाही कारण मी आमच्याच नव्हे तर शेजारच्या मतदारसंघातील उमेदवारालाही चांगलाच ओळखून होतो. आमच्या मतदारसंघात पात्र उमेदवार तेव्हा फक्त राष्ट्रवादी पक्षाने दिला होता व ते म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवडचे माजी महापौर माननीय श्री. आर. एस. कुमार. अतिशय सुविद्य व सुशील व्यक्ति. नागरीकांची कामे करण्यात तत्पर आणि अतिशय विनम्र.

परंतू त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाने शेजारच्या मतदारसंघात जावेद शेख या कूख्यात गुंडाला उमेदवारी दिली. या शेख महाशयांनी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंदुकीच्या धाकावर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले व स्वतः बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या एका मतदारसंघात राष्ट्रवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याचा हातच कापून टाकला. अशा पक्षाला (त्यांचा आमच्या मतदारसंघातील उमेदवार चांगला असूनही) मतदान करून त्यांचे बळ वाढविण्यापेक्षा मी मतदान न करणेच पसंत केले.

याशिवाय मतदानाबाबत गोंधळ निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारांची बंडखोरी. कँाग्रेस हा धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारा पारंपारिक पक्ष, तर हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करतात असे म्हणत प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा शिवसेना हा पक्ष. गंभीर बाब म्हणजे शिवसेनेने तिकीट नाकारले म्हणून उमेदवार थेट कँाग्रेसमध्ये प्रवेश करतो आणि तिकीट मिळवून निवडणूक लढतो ही थट्‌टा मतदारांची की लोकशाहीची? म्हणजे एकदम १८० अंशातच हा उमेदवार फिरला. याची धोरणे इतकी लवचिक कशी? की याला सत्तेशिवाय कधी काही धोरण नव्हतेच?

यापुढची महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांच्या पात्रतेत फारसा फरक नसणे. दुकानदाराने काळया रंगाचा शर्ट आपल्याला दाखवला आणि आता समजा आपल्याला काळा रंग आवडतच नाही म्हणुन आपण त्याला दुसरा शर्ट दाखवायला सांगितले. हा दुसरा शर्टही काळाच फक्त त्यावर मधुन मधुन अगदी थोडे पांढरे ठिपके आहात. हाही आपल्याला आवडला नाही कारण आपला आवडता रंग पांढरा आहे आणि कहर म्हणजे दुकानदाराकडील साऱ्या शर्टांना काळया रंगाच्याच छटा आहेत अशा वेळी आपल्याला निवड करण्यात काही स्वारस्य राहील का? शेवटी दुकानदाराला आपण त्याच्याच आवडीचा कुठलाही एक शर्ट बांधून द्यायला सांगू. नेमके हेच कारण लोकांचा मतदानातला रस संपायला कारणीभूत आहे. कोणीही सत्तेवर आला तरी स्वतःच्या तुंबडया भरणारच याची उमेदवारांपेक्षाही जनतेलाच जास्त खात्री आहे. कोण किती रकमेचा अपहार करणार या आकडयांमध्ये काळया रंगाच्या विविध छटांमध्ये असणाऱ्या सुक्ष्म फरकापेक्षाही कमी फरक आहे. अर्थात एखाद्या मतदारसंघात जावेद शेखसारखा गुंड आणि त्याच्या विरोधात एखादा निःस्पृह समाजसेवक उभा असेल तर कदाचित तेथील १०० टक्के मतदारही मतदान करतील. परंतू असे गुंड बहुतांश वेळा बिनविरोध अथवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन देखील निवडून येतात हेही जनतेच्या आता पचनी पडले आहे.

तसेच निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरौखरच प्रभावीपणे काही करू शकतात की नोकरशाही पुढे झुकतात हाही एक संशोधनाचाच विषय आहे. सरकार पाच वर्षे अथवा त्याहून कमी काळ टिकते नोकरशाही चिवट असून सहजी बदलत नाही. कित्येक आधिकारी तर मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. त्यामूळे कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी जनतेला फारसा फरक पडत नाही.

निवडून दिलेल्या प्रतिनिधीने आपली कितीही निराशा केली तरी आपण त्याला पुढच्या निवडणूकीपर्यंत बदलु शकत नाही ही लोकशाहीची अजून एक मोठी शोकांतिका. साधे घरातल्या नोकराचे काम पसंत पडले नाही तर त्याला आपण एक महिन्याची आगाऊ सूचना अथवा पगार देऊन नोकरीवरून काढू शकतो पण शासनात इतकी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी नेमलेला उमेदवार समाधानकारक काम करत नसला तरी सहन करावा लागतो.

ह्ी आणि अशी अजूनही अनेक कारणे आहेत ज्यामूळे मी मतदान का करावे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो. बुध्दिवादी माणसांना असे प्रश्न पडत नाहीत. ते म्हणतात ‘त्यातल्या त्यात’ बऱ्या उमेदवाराला मत द्या. आता जर वर्गात सारे पस्तीस टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे असतील तर ‘त्यातल्या त्यात’ कुणाला उत्तीर्ण करणार? सैन्यातील कठोर पात्रता पुर्ण करणारे फारच कमी उमेदवार मिळतात त्यामूळेच सैन्यात अनेक जागा रिक्त आहेत, पण म्हणून पात्रतेचे निकष शिथील करून कुणाही ‘त्यातल्या त्यात’ बऱ्याला सैन्यात भरती करीत नाहीत. तेव्हा शेवटी मी इतकेच म्हणेन,
‘मेरे ख्वाबोमें जो नेता है, वो सचमुच हो नही सकता।
किसी औरको मै नेता चुन लु..................... ये हो नही सकता।।

टीप : काही अक्षरांचे रुपांतर व्यवस्थित न होऊ शकल्याने मजकुरात काही किरकोळ दोष आहेत. तरी मूळ मजकूराकरिता गुगल पानांचा दुवा येथे देत आहे.
त्यानंतर या लेखाला प्रतिसाद म्हणून माझा मित्र श्री. मंदार मोडक याचे आलेले उत्तर त्याच्याच शब्दांत -
माझा मित्र मंदार याची माझ्या लेखावरील प्रतिक्रिया:-
date21 October 2009 13:23
subjectमी मतदान का केले?

प्रित मित्र
चेतन यास,

तुझा `मी मतदान का करावे?' हा चिंतनशील लेख वाचला. खूप चांगला लेख आहे. आपल्या सर्वांची
हीच समस्या आहे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. राजेशाही नाही म्हणून लोकशाही आहे असे
म्हणायचे दुसरे काय? लोकशाही मध्ये उमेदवार उभे राहणार , त्यापैकी वैयक्तिक पातळीवर बरावाईट कोण
तो ठरवून किंवा चांगला पक्ष बघून मतदान करणे भाग आहे.

पण चेतन तू नकाराधिकार तर नक्कीच वापरू शकतोस ना? मतदानास न जाता तू एकप्रकारे बोगस
मतदानासाठी जागा ठेवतो आहेस असे नाही का वाटत? आपले नाव त्या यादी मधून खोडले गेले
पाहिजे.

पूर्वीच्या कागदी मतदान पत्रिकांमुळे मत बाद करता यायचे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे येण्याआधी आणि
आता काय फरक झाला आहे ते पहा.

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमुळे हजारो टन कागद वाचला. मतमोजणीला लागणारा वेळ वाचला. निकाल
झटपट लागू लागले. एकही मत बाद न होता १००% मते वैध ठरू लागली.अनेक देश भारतातील
इव्हीएम प्रमाणे मतदान घेण्याचे ठरवू लागले. हे सर्व ठीक.खूपच स्वागतार्ह.

पण मतदाराला एकही उमेदवार आवडत नसेल तर? मतपत्रिकेने मतदान करताना नकाराधिकाराची
अप्रत्यक्ष संधी होती. चुकीच्या ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त जागी शिक्का मारून मत बाद केले की
झाले. आपले नाव खोडले गेल्याशी मतलब म्हणजे किमान आपल्या नावावर कोणी बोगस मतदान तरी
करणार नाही याची खात्री.पण यातही हे नकाराधिकारातून मुद्दामहून बाद केलेले मत की चुकून बाद
झालेले मत हे ठरवता येत नव्हतेच. ही सर्व मते बाद मतां मध्ये गणली जात.

पुढे इव्हीएम आल्यावर ही `सोय' बंद झाली. मग नकाराधिकारासाठी विशिष्ट फॉर्म भरून देता येइल
असे पेपर मध्ये आले होते. मी मागील विधानसभा निवडणूकीत हा पर्याय वापरला होता. आमच्या इथे
अवघे ४ उमेदवार होते. मला कोणालाच मत द्यायचे नव्हते. तेथील अधिकाऱ्यांना व्हिटो राईट बद्दल
संगितले असता त्यांनी त्याबद्दल अनभिज्ञता दाखवली. शेवटी म. टा. चे कात्रण दाखवल्यावर त्यांच्या
डोक्यात प्रकाश पडला. मग एका कॉलममध्ये त्यांनी कोणालाही मतदान केले नाही असे लिहून घेऊन
सही घेतली. बोटाला शाई लावली. नावावर काट मारली. पण या सर्व प्रकारात माझे मत गुप्त राहिले
का? तर नाही. मी कोणालाच मत दिले नाही ही बाब उघड झाली. मग गुप्त मतदान पद्धतीला काय
अर्थ राहिला? म्हणुनच अनेक संघटना नकाराधिकाराचे बटन मशीनवरच हवे म्हणून मागणी करत आहेत
व अशा मतांचीही मोजणी व्हावी असा त्यांचा आग्रह आहे.

वर वर पाहता हे चुकीचे वाटेल. थोडा अभ्यास करून त्यातल्या त्यात चांगला उमेदवार निवडावा असेही
सांगितले जाते. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसते. उमेदवाराची महिती मिळवण्यास वेळ असतोच असे
नाही. कधिकधि ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अनेक उमेदवारांच्या नावावर पोलिस केस सुरू
आहेत. या केसेस कोणत्या गुन्ह्याखाली सुरू आहेत हे ही कळू शकते. पण कोणत्यातरी चांगल्या
आंदोलनासाठी तुरुंगात गेलेल्या उमेदवाराच्य नावावरही क्रिमिनल रेकॉर्ड दिसते. हे चुकीचे नाही का?
अग्नि संस्थेने मतदारसंघ निहाय सर्व उमेदवारांची अशि यादी बनवून प्रसिद्ध केली आहे. यात त्या
उमेदवाराचा पक्ष वय, शिक्षण,एकूण मालमत्ता,त्या भागाचा रहिवासी आहे की नाही,पॅन क्र. दिला आहे
की नाही,कन्व्हिक्शनस,पेण्डींग केसेस अशी यादी दिली आहे.
ही साईट पहा www.myneta.info

मुख्य पक्षांचे उमेदवार सोडल्यास (कदाचित तेही नाहीत) आपल्या मतदारसंघात कोणकोणते उमेदवार उभे
आहेत हे मतदान केंद्रावर गेल्यावर तेथे बाहेर लावलेली enlarged मतपत्रिका पाहूनच कळायचे.
अग्निच्या यादीमुळे ही नावे घरबसल्या कळू शकतात. काही असो..मतदान हे पवित्र कर्तव्य आहे असे
मानले चुकीच्या उमेदवाराला मत देऊन पाप केले आहे असे वाटू नये म्हणून हा नकाराधिकारावरील ई-
पत्र प्रपंच होता.

पण आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. आणि उद्या `निक्काल' लागणार आहे. पाहुया घोडामैदान
जवळ आहे. मला तरी वाटते की सध्याचेच आघाडी सरकार परत सत्तेत येईल.

- मंदार.
मंदारच्या पत्राला मी दिलेले प्रत्युत्तर -
मंदारला माझे उत्तर
21 October 2009 14:51
परम मित्र मंदार,

तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझ्या ई-पत्रातील ’घोडा मैदान जवळ आहे’ या वाक्याने घोड्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले त्यामुळे मी या वाक्याऐवजी ’डूक्कर - उकिरडा जवळ आहे’ अशी मनातल्या मनात सुधारणा करून वाचले. असो.
खाली आजच्या लोकसत्तातील अग्रलेख दिला आहे तो काळजी पूर्वक वाच. त्यांचे शेवटचे वाक्य "सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे." अतिशय बोलके आहे. माझ्या मतदारसंघात कोणीच उमेदवार / पक्ष लायक नव्हता (मी लेखात लिहील्याप्रमाणे ज्या पक्षाचे नेते चांगले आहेत उदा. अजित पवार त्यांचे उमेदवार चांगले नव्हते तर चांगल्या उच्चशिक्षीत उमेदवारांनी रिडालोस मध्ये सामील होऊन स्वत:ला अबू आझमी व रामदास आठवलेंसारख्या दिशाहीन नेत्यांच्या दावणीला बांधले होते. असो.)
आता सगळेच उमेदवार इतके नालायक असल्यावर खरे मतदान होवो अथवा बोगस मतदान निवडून येणार यांच्यापैकीच एक. मग या बोगस मतदानाचा बाऊ कशाला करायचा? आणि जर खरेच इतके बोगस मतदान होते तर दर निवडणूकीत ६० टक्क्यांच्या आसपासच मतदान झालेले दिसते ते का? बोगस मतदान झाले तर १०० टक्के नाही तरी निदान ८० ते ८५ टक्क्यांचा आकडा दिसायला हवा. असो. मला वाटते मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.
माझ्या मते सरकार कुणाचे येते ते महत्वाचे नाही (कारण सार्‍यांची नियत आणि कुवत सारखीच). आपण त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडणे आणि त्यांचा पाठपुरावा (Follow-Up) करणे महत्त्वाचे. पाच वर्षांपुर्वी आपण अशाच आपल्या मागण्या लोकसत्तामार्फ़त मांडल्या आणि आपल्याला माननीय मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुखांबरोबर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी चर्चेची संधी मिळाली. आपली ओळखही त्या निमित्तानेच झाली. (आठवण ताजी करण्यासाठी त्या प्रसंगी काढलेले प्रकाशालेख (Photograph चा खरा मराठी अनुवाद) पाठवित आहे).
आताही तू म्हणतोस तसे आघाडीचेच सरकार आले आणि पुन्हा विलासरावच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले तर लोकसत्ताने आपल्याला पुन्हा एकवार चर्चेची संधी द्यायला हवी. पुर्वीच्या मागण्या कितपत पुर्ण झाल्यात याचाही ऊहापोह करता येईल. तू मुंबईतच राहतोस तेव्हा शक्य असल्यास कुमार केतकरांची भेट घेऊन ही मागणी करावीस असे मला वाटते. माझ्या आठवणी प्रमाणे तू तेव्हा चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे संपर्क पत्ते व दूरध्वनी क्रमांक लिहून घेतले होतेस तेही केतकरांना देऊ शकतोस. मला वाटते सारे जण अत्यंत आनंदाने पुन्हा सामील होऊ शकतील.
वर उल्लेखित लोकसत्ता मधला अग्रलेख
तीन कोटींचा तमाशा!
बुधवार, २१ ऑक्टोबर २००९
येत्या एक-दीड दिवसात महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. विधानसभेवर निवडून येण्यासाठी इरेला पडलेल्या उमेदवारांनी पैशांची केलेली उधळपट्टी ही शरमेने मान खाली जावी, अशी आहे. एकेका मतदारसंघात किमान तीन तीन कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. या हिशेबाने २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण किती पैसे उडवण्यात आले, याचे त्रराशिक मांडले तर तीन हजार कोटींहून अधिक रुपये या तमाशात उधळले गेले आहेत, असे लक्षात येईल. सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे हे पैसे खर्च झाले, ही वस्तुस्थिती आहे. वाईट याचे वाटते, की या पैशात यंदा मोठय़ा प्रमाणात बहुतेक लहानमोठय़ा प्रसारमाध्यमांनी अत्यंत घृणास्पद अशी भूमिका बजावली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर या भ्रष्ट ‘पॅकेजीकरणा’च्या लाटेवर अनेकजण स्वार झाले होते. अनेक ‘मीडिया’ घराण्यांचे मालक, चालक पैशाच्या अशा व्यवहारात आघाडीवर होते, ही वस्तुस्थिती आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक निधीचा एकतृतीयांशहून अधिक हिस्सा प्रसारमाध्यमांना पुरस्कृत करण्यासाठी राखून ठेवला होता, असे म्हणतात. एकाच वेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले आणि तिथेही ‘त्यांनी इतके दिले, तुम्ही किती देणार’, अशी सौदेबाजी केली गेली. काही मालक स्वत:च पैसे आणायला बाहेरगावी जात होते अशी उघड चर्चा होती. प्रश्न उमेदवाराने राजकीय आखाडय़ात उभे राहून स्वत:ची बोली लावण्याचा होता, ती ते लावत होते. वीस-पंचवीस लाखांच्या आतबाहेर प्रत्येकाचा ‘मीडिया’शी स्वतंत्र व्यवहार ठरत असे, असे सांगितले गेले. अशी ही विक्रीव्यवस्था एकाचवेळी चौघांशी झाल्यास ‘मीडिया’चे ‘पॅकेज’ कोणत्या स्तरावर जात असेल, याचा विचार न करणे उत्तम! अमेरिकेत काही काळापूर्वी ‘चेक-बुक जर्नालिझम’ कुविख्यात होते, पण इथे त्याने ‘आज रोख उद्या उधार’ या तत्त्वाचा डाव मांडला. पत्रकारितेतही पूर्वी काही थोडय़ांना दारू पाजली की पुढे सर्व काम सुरळीत होत असे, असे म्हटले जाई. आता हे सर्व ‘ट्रेड इन कॅश’ पातळीवर पोहोचले आहे. तुमच्यासंबंधात गैर न छापण्यासाठी अमुक इतके, चांगले छापण्यासाठी अमुक इतके आणि प्रतिस्पध्र्याची अडचण करून ठेवणारी बातमी छापायचे अमुक इतके, असा हा सारा व्यवहार! काही पत्रकारांनाही त्यासाठी कामाला लावण्यात आले होते आणि त्यांनीही ही ‘कामगिरी’ बिनबोभाटपणे पार पाडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशा पद्धतीचे व्यवहार झाले, परंतु तेव्हा मतदारसंघ ४८ आणि महत्त्वाच्या उमेदवारांचे प्रमाण त्या मानाने कमी. या खेपेला २८८ मतदारसंघ आणि त्या प्रत्येकाची परिणामकारकता जास्त. स्वाभाविकच ज्यांना निवडून यायचे आहे, अशांनी हा दौलतजादा केला असेल तर नवल नाही. या संतापजनक बाबीची बाजारात चविष्टपणे चर्चा होत असली तरी संबंधित माध्यमांच्या मालक, चालक, पालक यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. ‘पेज थ्री’ संस्कृतीचे हे विकृतीकरण नसानसात भिनल्याचे पाहायला मिळावे, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते? काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पैसे कसे उधळले, याच्या सुरस आणि रंजक कथा अजूनही कानावर येत आहेत. काही मतदारसंघांत स्वयंचलित दुचाकी वाहनांपासून मोटारीपर्यंत अनेक गोष्टींचे वाटप झाले. पुणे शहराचा लौकिक असा, की या शहरातले विद्वान खिशात भजी ठेवून रस्त्याने जाताना वाचन करायचे. आता कुणालाच वाचन करायचे नसल्याने, त्यांच्या खिशात भलत्याच गोष्टी निघतात. खिशात अंगठय़ा बाळगणाऱ्यांनी त्या मतदाराच्या बोटात सरकवल्याची सध्या चर्चा केली जात आहे. कोकणातल्या एका मतदारसंघात एका उमेदवाराच्या जीपमध्ये अगदी अलीकडे एक कोटी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ती जीप चौकशीसाठी ताब्यात घेतली. या जीपमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर नोटांचे एक बंडल, अशी शंभर बंडले मिळाल्याची चर्चा आहे. गंमत अशी, की ही जीप जेव्हा जवळच्या पंपावर नेण्यात आली, तेव्हा या जीपमध्ये मतदारांना वाटण्यासाठी ५० साडय़ा असल्याचे ‘निष्पन्न’ झाले आणि गुन्हा दाखल झाला. आता त्या एक कोटीचे काय झाले, याची खुमासदार माहिती चर्चेचा विषय बनली आहे. या हजार रुपयांच्या नोटा तरी खऱ्या का, असे विचारले जात आहे. याचे कारण असे, की महाराष्ट्रातल्या एका शहरात वाटण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. अशा बनावट नोटा चलनात आणायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना शिक्षा अपरिहार्य आहे. ज्याने हे पैसे वाटण्यासाठी दिले, तो कदाचित आता म्हणेल, की मी जेव्हा हे पैसे दिले तेव्हा ते खरे होते, नंतर त्यांचे काय झाले, ते मी कसे सांगणार? सुरस आणि चमत्कारिक अशा या कथांची मालिकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. महानगरांमधील मध्यमवर्गीय वसाहतींनी आपल्या इमारती रंगवून घेतल्या, तर काहींनी आपल्या वसाहतींना पाण्याच्या मोठय़ा नळांचे कनेक्शन जोडून घेतले. काही डोकेबाज व्यवस्थापकांनी आपल्या वसाहतींच्या सर्व केबलजोडची दोन वर्षांची वर्गणी उमेदवाराला भरायला सांगितली आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीने पैसे भरल्याची पावती जेव्हा त्या वसाहतीच्या अध्यक्षांना दाखवली, तेव्हाच त्यांनी संबंधित उमेदवाराला मत द्यायचा फतवा आपल्या सभासदांना उद्देशून काढला, असेही म्हणतात. पूर्वी झोपडपट्टय़ांमध्ये साडय़ा वाटल्याचे आरोप करणाऱ्या तथाकथित सुशिक्षितांनी या वेळी अशा व्यवहारांमध्ये खुलेआम स्वत:ला झोकून दिले होते. मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांकडून कोणकोणते डावपेच लढवले गेले, हे ऐकताना एखाद्याची मती खरोखरच गुंग होऊन जाईल. प्रश्न, कुणी काय घेतले किंवा कुणी काय दिले, यापेक्षा या सगळय़ांकडे एवढे पैसे आले कुठून, हा आहे. या उमेदवारांपैकी कदाचित फारच थोडे गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असू शकतात, फारच थोडय़ांचे काळे धंदे असू शकतील, त्यापैकी फारच थोडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा बाळगणारे असू शकतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च केला जाऊनही निवडणूक आयोगाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, हा जसा एक भाग आहे, तसा प्राप्तिकर खात्याची मंडळी या काळात डोळय़ांवर पट्टय़ा बांधून स्वस्थचित्त का होती, असा दुसरा प्रश्न आहे. यापैकी काही उमेदवारांची स्विस बँकेत खाती आहेत किंवा काय, याची माहिती तपासण्याची गरज आहे. ज्यांची स्विस बँकेत खाती आहेत, अशांपैकी कुणीतरी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला मदत करायला पुढे आले असण्याची शक्यता आहे. हा उमेदवार निवडून आला, की त्याला दामदुपटीने परतफेड करायला लावायचाही संबंधितांचा डाव असू शकतो. या उमेदवारांपैकी फारच थोडय़ांनी कर्ज काढून निवडणुकीची ही दिवाळी साजरी केली असण्याची शक्यता आहे. कोणतीही बँक उद्योगधंद्यासाठी जसे कर्ज द्यायला तयार होते, तशी ती निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे म्हणून कर्ज द्यायला तयार होत नाही. निवडणूक आयोगाने पैसा खर्च करायची जी मर्यादा ठरवून दिली ती यातल्या प्रत्येकाने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ओलांडली असण्याची शक्यता आहे. तरीही निवडणूक आयोग मत व्यक्त करेल, असे नाही. स्विस बँकेने परवाच, आपण भारताला सर्व खातेदारांची नावे द्यायला तयार आहोत, असे जाहीर केले आहे. तसे घडले तर ज्या भारतीयांचे स्विस बँकेत पैसे आहेत, त्यांची पाचावर धारण बसणार आहे. भारतीयांचे ७० हजार कोटी रुपये स्विस बँकेत आहेत, त्यात यांच्यापैकी कुणी नसेल, अशी शक्यता नाही. शेवटी कुणाच्या तरी वारेमाप पैशाच्या जिवावरच हा सगळा मस्तवालपणा केला गेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी खर्च केलेले पैसे, उतरल्यानंतरचे पैसे आणि निवडून येताच मंत्रिपद लाभावे म्हणून खर्च होणारे पैसे, असे तीन प्रकार सध्या चर्चेत आहेत. त्यात आता सट्टेबाजाराचीही भर पडली आहे. निवडणुकीच्या रिंगणात या खेपेला बरेच कोटय़धीश उभे होते, त्याचाही हा परिणाम आहे. सामान्य माणूस यापुढे उमेदवारीच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, याची ही पावती आहे.

Thursday, 27 March 2014

काळा घोडा

आधी Dark Horse ही काय संकल्पना आहे ते ठाऊक नसणार्‍यांकरिता:- घोड्यांच्या शर्यती प्रेक्षक दुरून पाहत असता त्यांना काही घोडे विजयाच्या टप्प्यात आल्यासारखे आढळतात.  त्यांच्यापैकीच एखादा विजयी होणार यावर ते अंदाज बांधून पैजदेखील घेतात.  असे चर्चेत असणारे किमान पाच सहा घोडे असतात आणि बहुतेकवेळा त्यापैकीच एखादा विजयी होतो.  कधी कधी मात्र या चर्चेत नसणारा एखादा घोडा विजयी होतो.  हा  घोडा अचानक कुठून येतो?  सुरुवातीपासून तो कधीच पहिल्या पाचात नसताना अचानक एकदम मागून पुढे येतो का? तर तसे नाही.  तो सुरुवातीपासूनच पहिल्या पाच सहांमध्ये असतो परंतु तो गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असल्याने इतर उजळ रंगाच्या घोड्यांकडे जसे प्रेक्षकांचे लक्ष असते तसे याच्याकडे नसते.  हीच ती डार्क हॉर्स संकल्पना.

सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणूकांचा हंगाम आहे.  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.  त्यांच्यापैकी एखादा पंतप्रधान होऊ शकतो हे खरेच परंतु त्यांच्याव्यतिरिक्त देखील एखादा उमेदवार अचानक पंतप्रधानपदी आरूढ होणे शक्य आहे.  गेल्या वीस वर्षांचा इतिहास पाहिला तर १९९६ मध्ये १३ दिवस, १९९८ मध्ये १३ महिने आणि १९९९ मध्ये साडेचार वर्षे पंतप्रधान पदावर राहिलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा अपवाद वगळता इतर सर्वच उमेदवार ( पी. वी. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल व मनमोहन सिंह दोन्ही वेळा) हे अगदी अनपेक्षित रीत्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत.

यावेळीही नरेन्द्र मोदी, राहूल गांधी, नितीशकुमार ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.  मायावती, मुलायमसिंह आणि ममता बॅनर्जी यांचीही या पदाविषयीची आकांक्षा जाहीर आहेच.  शरद पवार स्वत: नाही म्हणत असले तरी त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षातील नेत्यांप्रमाणेच नाना पाटेकरांसारखे अभिनेतेही आग्रही आहेत.  मनमोहन सिंह काही बोलत नसले तरी त्यांना स्वत:ला पुन्हा एक टर्म करायची इच्छा आहेच (खरे तर त्यांना इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंचाही विक्रम मोडायचाय).  अरविंद केजरीवालना राज्य पातळीवर लॉटरी लागली होतीच तशीच आता पुन्हा राष्ट्रीय पातळीवर लागेल अशी अपेक्षा असणारच.  दिग्विजय सिंह पुन्हा पुन्हा सुषमा स्वराज यांचे नाव घेत आहेत.  जयललिता या प्रादेशिक नेत्या असल्या तरीही देवेगौडांप्रमाणेच त्यांनाही तिसर्‍या आघाडीत सामील होऊन पंतप्रधान होण्यास वाव आहे.  

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असा कोणी नेता आहे का की जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला डार्क हॉर्स ठरू शकेल?  अर्थातच माध्यमांनी त्याचे नाव पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार म्हणून झळकवले असेल तर तो शर्यतीत तर राहील परंतु डार्क हॉर्स ठरू शकणार नाही.  

तेव्हा ज्याच्या नावाची पंतप्रधान पदाकरिता अद्याप चर्चा झालेली नाही असा माझ्या मते संभाव्य उमेदवार म्हणजे राजनाथ सिंह.  या निवडणूकांवर अगदी सुरुवातीपासून लक्ष दिले असता असे आढळून येते की, नरेन्द्र मोदी यांना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून विनाअट आणि विनातक्रार सर्वशक्तीनिशी पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजनाथसिंह.  नरेन्द्र मोदींना अडवाणी, स्वराज, अशा अनेक दिग्गजांचा सुरुवातीपासून प्रचंड प्रमाणात विरोध होता.  हा विरोध मोडून काढत तगडा पाठिंबा राजनाथ सिंह यांनीच दिला.  राजकारणात, युद्धात, व्यापारात (आणि प्रेम सोडून इतर सर्वच प्रकरणांत) कोणीच कोणाकरिता काहीच फुकट करीत नाही.  मग राजनाथसिंहानी मोदींकरिता अचानक एवढे सर्व का करावे?  तर माझा अंदाज असा की, मोदीच्या नावावर त्यांनी गुजरातेत केलेल्या विकासाच्या बळावर जनतेकडे मते मागावी, भरघोस जागा मिळवाव्यात आणि भाजपला विजयाच्या समीप आणून उभे करावे.  जर भाजपला पाठिंब्याकरिता काही जागांची गरज पडलीच तर इतर पक्षांचा पाठिंबा मिळविताना पुन्हा नरेन्द्र मोदींची आक्रमक हिन्दुत्ववादी ही प्रतिमा प्रसारमाध्यमांद्वारे ठळक करावी म्हणजे नरेन्द्र मोदींचा पर्याय बाजुला पडून इतर नेत्यांची नावे विचारात येतील परंतु यातही मोदींच्या पसंतीचा उमेदवार म्हणून स्वत:ची वर्णी लावून घ्यावी.  तसेच जर भाजपला संपूर्ण बहूमत मिळाले तर मोदींच्या जीवाला धोका आहे असे सांगून त्यांच्या सुरक्षिततेकरिता त्यांच्याऐवजी आपणच पदावर आरुढ व्हावे असा काहीसा या भाजपाध्यक्षांचा डाव असू शकतो.  २००४ मध्ये संपुआला बहुमत मिळूनही सुषमा स्वराज आदींच्या जोरदार विरोधामुळे सोनिया गांधी पंतप्रधान न होता आकस्मिक रीत्या मनमोहन सिंह पंतप्रधान झाले होते त्या प्रसंगाशी साधर्म्य राखत यावेळी राजनाथ सिंह यांना पंतप्रधान बनणे शक्य आहे.  

Saturday, 7 May 2011

दहशतवादावरील एक प्रचंड मोठा वाद

महाजालावर Google Buzz ह्या Application चा उपयोग नेहमीच चर्चा करण्याकरिता केला जातो.  लोक आपले मत मांडण्याकरिता Buzz सुरू करतात.  इतर लोक ते वाचतात.  शक्य असल्यास त्यावर अभिप्राय देतात.  असंच एकदा मी एका Buzz वर माझं मत नोंदविलं आणि सुरू झाला एक प्रचंड मोठा वाद.  खरं तर मी जे मत मांडलं ते बहुसंख्य सामान्य जनांचं मत असावं असं मला वाटत होतं.  अर्थात Buzz वर मला याच्या नेमका उलट अनुभव आला.  माझ्या मताच्या विरोधात अनेक जण अक्षरश: तुटून पडले.  प्रत्येकाला मी माझ्यापरीने शक्य तितक्या शांतपणे प्रत्युत्तर दिले.  पण तरीही काही हेकेखोर मंडळी स्वत:चे तेच तेच मुद्दे रेटत राहिली.  काही वेळा अशांना प्रत्युत्तर देताना मग माझाही संयम सुटला.  आक्रमक भाषा वापरली गेली.

अचानक या आठवड्यात मी पुन्हा दोन दशकांपुर्वी गाजलेला हिन्दी चित्रपट पाहिला आणि माझी ट्यूबलाईट पेटली.  या चित्रपटाची नायिका जे मत मांडत असते, तेच मत तर मी प्राणपणाने मांडत होतो.  नायिकेच्या मताचा आदर केला गेल्याचेच चित्रपटात  आहे.  याचा अर्थ चित्रपटकर्त्याचेही तेच मत आहे.  त्याशिवाय चित्रपटात नायिकेचे असे मत दाखविल्याबद्दल चित्रपटावर अथवा निर्मात्यांवर त्या काळात टीका देखील झालेली नव्हती.  चित्रपट तुफान चालला होता याचाच अर्थ बहुसंख्यांना हे मत पटले असणारच.  मग तेच मत मी बझ्झ वर मांडले तर मी अल्पमतात का बरे आलो?

जर कुणाला हा महाजालावरील महावाद वाचायचा असेल तर त्याची Link खाली देत आहे.


परंतू या Buzz चा Owner मी नाही.  त्यामुळे हा Buzz महाजालावर राहील की काढून टाकला जाईल यावर माझे अर्थातच नियंत्रण नाही.  म्हणूनच हा वाद जसा घडला तसा इथे पुन्हा उद्धृत करीत आहे.

सर्वप्रथम ते चित्र ज्यावरून हा Buzz सुरू करण्यात आला.
त्यानंतर आता लोकांच्या (माझ्यासह) या चित्रावरील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्यातून झडलेला हा वाद.

15/2 महेंद्र .: हे सगळं कुठून येतं?

(सौजन्य:-गणेश बागल फेस बुक )
15/2 Raj Jain: जरा फरक आहे.. दुस-या दिवशी फाशीवर नाही चढवला, जवळ जवळ ३-४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता, संदर्भ शोधून देतो हवा तर... बाकी इंदिराजींच्याकडे निर्णय घेण्याची व त्याची अमंलबजावणी करण्याची प्रचंड ताकत होती हे कोणीही मान्य करेल :)
15/2 महेंद्र .: मला फेस बुकवर सापडलं. गणेश बागलच्या प्रोफाइल वर.. जरी दुसर्या दिवशी नाही, तरीही तिन महीने पण फार नाहीत!
15/2 Vidyadhar Bhise: >>On February 6, 1984, JKLF members murdered the Indian diplomat Ravindra Mhatre, in Birmingham, England. One of their demands was the release of Bhat. After this, his petition for clemency was rejected, and Bhat was executed in the Tihar Jail in New Delhi on February 11, 1984.[3].
Wikipedia!
15/2 Raj Jain: माझ्या संदर्भात शक्यतो चूक होती अथवा वाचणात, धन्यवाद विभी.
15/2 Vidyadhar Bhise: :)
15/2 आ का Anand Kale: मला हे लाईक करावस वाटलं...
15/2 विनोदकुमार शिरसाठ: जबरदस्त ......
15/2 CHETAN GUGALE: रविंद्र म्हात्रे ऐवजी राजीव गांधींचं अपहरण झालं असतं तर इंदिरा गांधी अशाच वागल्या असत्या का?

आपले उच्चाधिकारी (किंवा अगदी सामान्य प्रजाजनही) ओलीस ठेवले गेले असल्यास अतिरेक्यांची सुटका करण्यात काहीच गैर नाहीय. शिवाजी महाराजांनीही आपल्या माणसांचे प्राण वाचविण्याकरिता वेळप्रसंगी शत्रूशी तह केलाय, कारण गड पुन्हा मिळविता येतात सिंह गेला तर ती उणीव कधीच भरून येत नाही.

मी इंदिराजींच्या जागी असतो तर रविन्द्र म्हात्रेंना वाचविण्याकरिता अतिरेक्याला सोडण्याची किंमत चूकविली असती. XXत धमक असली तर अशा अतिरेक्यांना पुन्हा पकडता येते. इंदिराजींनी स्वत:ला रविन्द्र च्या आईच्या जागी ठेवून विचार करायला हवा होता.

यह पूरब है, पूरबवाले हर जान की कीमत जानते है हे कृतीतही असावं लागतं, नुसतं उक्तीत असून चालत नाही.

या पार्श्वभूमीवर कंदहार प्रकरणी वाजपेयी सरकारचा निर्णय अगदी योग्य होता. योगायोगाने त्या कालावधीत दोन महिन्यांकरिता (२० डिसेंबर १९९९ ते २२ फेब्रुवारी २०००) मी देखील घरापासून १५०० किमी दूर बिहार मध्ये कार्यालयीन कामाकरिता गेलो होतो. समजा माझं अपहरण झालं असतं तर माझ्या कुटुंबियांनी सरकारकडून काय अपेक्षा केली असती? हा विचार माझ्या मनात येतो.
15/2 Anagha Nigwekar: ह्या संवादात शिरण्याबद्द्ल माफी...
जगभर सतत इतका प्रवास करत असताना...जर माझं असं काही अपहरण झालं तर "माझ्या आईला सोडवा आणि त्यासाठी त्या अतिरेक्यांना सोडवा" असला लाजीरवाणा आक्रोश करून मला लाज आणू नकोस हे मी कधीच माझ्या लेकीला सांगून टाकलेले आहे!!
अर्थात ह्या गोष्टी कधीही खरोखर परिस्थिती उभी राहिल्याखेरीज सिद्ध करता येत नाहीत....
15/2 CHETAN GUGALE: << असला लाजीरवाणा आक्रोश करून मला लाज आणू नकोस हे मी कधीच माझ्या लेकीला सांगून टाकलेले आहे >>

एकदम मान्य. अनघाजी तुमचं वय काय आहे ह्याची मला कल्पना नाही पण उतारवयाकडे झुकलेल्या माझ्या आईवडिलांना माझी गरज आहेच. ती अमान्य करून कसं चालेल? बिहारमध्ये होतो तेव्हा मी फक्त २१ वर्षाचा होतो. मुख्य म्हणजे कायदा मला शस्त्र बाळगू देत नाही तर माझं रक्षण करण्याची जबाबदारी आपोआपच सरकारच्या शिरावर येते. त्यात ते कमी पडले तर त्याची किंमत त्यांनी चूकती करायला नको का? ती मी किंवा माझ्या कुटुंबियांनी का करावी? आणि तशी माझी तयारी असतीच तर मी सैन्यात किंवा पोलिसांत नसतो का भरती झालो?

सैन्यातील जवान शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबियांना बर्‍यापैकी नुकसान भरपाई मिळते असं ऐकून आहे. अर्थात धूप या हिंदी चित्रपटात शहीद जवानाच्या बापाला पेट्रोल पंप मिळविण्याकरिता किती त्रास सहन करावा लागतो ते ओम पूरी ने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहेच. ते पाहिल्यावर शहीद होण्यापूर्वी कुणीही दहावेळा विचार करेल.

बाकी ज्याचे त्याचे विचार....
15/2 Anagha Nigwekar: कुठलेही आयुष्य देशापुढे मोठे नसते.....कुठलेही...आणि कोणत्याही वयात....

बाकी ज्याचे त्याचे विचार....
15/2 CHETAN GUGALE: देशाविषयीची माझी कल्पना थोडी वेगळी आहे.
शक्य असल्यास हे वाचून पाहावे.
http://mimarathi.net/node/4684
15/2 Raj Jain: आता मी मध्ये घूसतो आहे, क्षमा.

इंदिरा यांनी जे केले ते नेता म्हणून त्यावेळी योग्य होते, हे माझे मत आहे, कधी कधी कठोर निर्णय घावे लागतात, भले ते नंतर शक्यतो चुकीचे वाटतील... ( ब्लु स्टार अथवा राजीव ने पाठवलेले श्री लंकेला सैन्य हा निर्णय) जर खरचं देश अथवा मी असा जर कधी प्रसंग आला तर शक्यतो मी उत्तर देण्यात एक क्षणाचा देखील वेळ लावणार नाही, आधी देश. यांचे कारण मी देऊ शकतो पण ते सर्वमान्य नाही आहे म्हणून देत नाही आहे, चेतन , पण फक्त एवढेच म्हणेन जर आपल्या सैन्यातील प्रत्येकाने स्वतःचाच विचार केला तर ? कधी कधी हत्यारे किती कुचकामी असतात हे मी स्वतः पाहिलेले आहे, नशीबाने २ वेळा अतिरेकी हल्ल्यातून फक्त काही क्षण.. मिनिट आधी निघाल्यामुळे वाचलो आहे व त्यानंतरचा मनस्ताप भोगला आहे.
15/2 Raj Jain: या बाबतीत रशियाचे मास्को चे उदाहरण प्रेरक ठरावे सर्वांना.... ( म्हणजे नेत्यांना ) भले तो आज क्रुरता वाटेल, पण त्यावेळी त्याच्या सरकारला जे योग्य वाटले तेच केले. झुकण्यापेक्षा बळी जाणे महत्त्वाचे.. असे हल्ले केले की तुम्ही झुकता असे दिसले की मग अश्या हल्ल्यांची रांग लागते... पाहतो आहोत ना आपण.. अफझल गुरु.. कसाब.. अजून पेंडिंग ३६ एक केसेस... ( राष्ट्रपती कडे) अजून फाशी नाही, त्यांचेच उदाहरण देऊन नवीन भरती हे आतंकवादी करत नसतील कश्यावरून ?
15/2 CHETAN GUGALE: << जर आपल्या सैन्यातील प्रत्येकाने स्वतःचाच विचार केला तर >>

राज,

याचं उत्तर मी आधीच दिलंय. सैन्यातील लोक ती जाणीव ठेवूनच वावरत असतात. इतरांचं तसं नसतं. इतर नागरिक नि:शस्त्र फिरत असतात ते कुणाच्या भरोश्यावर? सैन्य आणि पोलीस यांच्याच ना? नाहीतर आपल्या देशाने असं करावं ना - सरळ अमेरिके सारखा मुक्त शस्त्र परवाना वाटप करावं. एक सामान्य नागरिक म्हणून परवान्यासह शस्त्र बाळगता येत असेल तर माझी सुरक्षितता मी स्वत:च पाहीन. इतकं असतानाही जर मी अतिरेक्यांच्या तावडीत सापडलोच तर मात्र माझ्या करिता सरकारने तडजोड करावी अशी माझी अथवा माझ्या कुटुंबियांची अपेक्षा निश्चितच नसेल.

पण आताच्या कायद्याप्रमाणे आमचे हात बांधलेले आहेत. अनेकदा समाजात वावरत असताना मला चूकीच्या गोष्टी घडताना दिसतात पण मी त्यांना रोखू शकत नाही. जर मला लढण्याची परवानगी तर माझीही मरण्याची तयारी नाहीय.

ज्या लोकांना अशी लढण्याची परवानगी असते आणि त्याकरिता कार्बाईन सारखी अत्याधूनिक शस्त्रेही दिलेली असतात ते तर पूर्ण तयारीनिशी लढण्याकरिता गेले आणि ९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते, तिच्याविषयी काय बोलाल राजे?
15/2 Anagha Nigwekar: चेतन गुगळे, तुम्ही हे असले विचार पसरवून नक्की काय साधता आहात ह्याची मला कल्पना नाही. परंतु, ह्या विचारांची माझ्या देशाला गरज नाही एव्हढे मात्र निश्चित. तुमचे विचार खोडून टाकण्यासाठी मी किंवा माझ्या देशबांधवांनी त्यांचा मौलिक वेळ खर्च करावा असे मला वाटत नाही. इतर बरीच कामे आहेत ज्याची माझ्या देशाला गरज आहे...तेव्हा मी माझा सहभाग इथेच संपवते.
धन्यवाद.
15/2 Raj Jain: या बाबती आपले विचार एकदम भिन्न आहेत मित्रा :)
त्यामुळे येथे फक्त निष्फळ चर्चा होईल, व मतितार्थ काहीच मिळणार नाही.... असो.
फक्त हत्यारानेच लढता येतं तर हा तुझा गैरसमज आहे एवढेच म्हणेन... हे मी वर देखील लिहले आहे.
क्राईम ग्राफ अमेरिका व भारत याची तुलना असलेला मध्ये कुठेतरी पाहिला होता.. त्यांची आठवण झाली, तेथे परवाना असून देखील गुन्हेगारी आहे.. व सम प्रमाणात आहे.. :) माणूस सगळीकडे सारखांच.. पण.. जाउ दे.. :)
कधी तरी डॉक्टर कोटणीस की अमर कहानी नावाचा चित्रपट पहा, असे म्हणेन... व चित्रपट या नजरेने पाहू नका, आत्मकथा या नजरे ने पहा.
15/2 Raj Jain: >> ९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते

हा संदर्भ नाही समजला, व काही असो, कोणाबद्दल ही असो वाक्य रचना अत्यंत चूकीची आहे असे म्हणेन..
घटना कश्या घडतात व काय घडामोडी मागे-पुढे चालू असतात ते येथे सुरक्षित जागेवर बसून तुम्ही नाही सांगू शकत चेतन.

* पुन्हा एका चित्रपटाचा संदर्भ देतो, एकादी घटना कोणाच्या नजरेत कशी दिसू शकेल, तो त्या क्षणी काय विचार करु शकतो, या बद्दल एक नितांत सुंदर चित्रपट आला होता वेंटेज पाँईन्ट नावाचा.. हा देखील पहा, व यानंतर एखाद्या घटनेला एका पेक्षा अनेक बाजू असू शकतात हे तुम्हाला पटेल. कारण वरील बाब तुम्ही फक्त एकच बाजू पाहून लिहीत आहात असे वाटत आहे....

* २००८ ला जेव्हा करोलबाग दिल्ली येथे ब्लास्ट झाला तेव्हा त्या येरियामध्ये दिवाळी निमित्य १००० च्या वर पोलिस + अनेक अर्धसैनिक होते. तरी ब्लास्ट झाला, अनेक दगावले... ! अतेरिकी तुम्हाला सांगत अथवा कॉल करून येत नसतात.. व गोळीतर कधीच नाही.
15/2 विनोदकुमार शिरसाठ: अतिरेक्यां बरोबर तडजोड नकोच ...... मग कोणीही ओलीस असला तरी हरकत नाही .......
15/2 Sandhya Pawar: सेन्सेशनल लिखाण क्षणभर अपील होतं खरं पण पब्लिक फोरम मधे सारासार विचार करून केलेलं लिखाण नेहमीच भावतं... व्य्कती कितीही ग्रेट असल्या तरी त्यांचा कार्यकाळ ठरलेला असतो असं मला वाटतं.

आजच्या काळात भारत महासत्ता बनणार आहे, किकेटमधे नं १ आहे, आयटी मधे नं १ आहे, जीडीपी सुपर्ब आहे... नकारात्मक गोष्टी शोधून त्यात रमणं मान्यच नाही
15/2 Raj Jain: संध्याजी,
स्वारी फॉर जी :

मला शाळेत असताना नेहमी प्रश्न पडायचा, ही लोक इतिहास का शिकवतात... जे होते ते गेले.. त्यांनी काय करायचे होते ते केले... मग आम्ही का सनावळ्या घोकत बसायच्या....

उत्तरे खूप नंतर मिळाली.. का ? कारण त्यांच्या कार्यातून आदर्श घेणे व त्यांच्या चुकातून ती चूक टाळता येऊ शकते हे शिकण्यासाठी..
म्हणून इतिहास महत्त्वाचा देशाचाच नाही तर प्रत्येक व्यक्तीचा ...

भारत उद्याची महासत्ता... हे इंडिया शायनिंग नंतर चे सर्वांत जास्त चालेला शब्द आहे... महासत्ता होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्यांची सध्या आपल्याकडे वाणवा आहे....वाईट वाटेल अथवा राग येईल.. माझ्या या वाक्याबद्दल पण सभोवती पाहिले की जानवेल तुम्हाला ही.. ही अफुची गोळी आहे जनतेसाठी... बाकी काही नाही.. महासत्ताचा अर्थ काय आहे ? महासत्ता कधी एकेकाळी रशिया देखील होती व गेली कित्येक वर्ष अमेरिका त्या स्थानावर आहे त्यांनी काय मिळवले त्यापेक्षा त्यांनी काय केले ? युध्दे ??? तर असा महासत्ता भारत न झालेलाच चांगला...

क्रिकेटमधील यश हे फक्त ११ खेळाडूंचे व त्याच्या सलग्न असलेल्या संस्थाचे आहे... बाकी जनतेला मिळतो तो फक्त व फक्त आनंद.. क्षणीक !!

आयटी मध्ये आपण नंबर वन नाही आहोत.. आपण ऑउटसोर्स मध्ये होतो.. आता चीन आहे... !

राहिली जीडीपी.... परत अफुची गोळी..
जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जेव्हा सर्वसामान्य व्यक्तीच्या हाताबाहेर गेल्या असतील तर तेथे जीडीपी चा आकडा ९.५ असो अथवा ९९.५ असो... तो फक्त आकड्याचा खेळ आहे.
15/2 CHETAN GUGALE: राजे,

<<< फक्त हत्यारानेच लढता येतं तर हा तुझा गैरसमज आहे एवढेच म्हणेन... हे मी वर देखील लिहले आहे.
क्राईम ग्राफ अमेरिका व भारत याची तुलना असलेला मध्ये कुठेतरी पाहिला होता.. त्यांची आठवण झाली, तेथे परवाना असून देखील गुन्हेगारी आहे.. व सम प्रमाणात आहे.. >>>

असली तूलना हास्यास्पद आहे. तुम्हाला मी भारतात क्राईम ग्राफ शून्य असलेले प्रदेशही दाखवू शकतो. इथे एक टक्का गुन्ह्यांची तरी नोंद होते का? पोलिस ठाण्यात जाऊन स्वत: अनुभव घ्या. सरळ MIGHT IS RIGHT चा अनुभव येतो पदोपदी. सानंदा प्रकरण ताजे आहे. अधिक सांगणे न लगे. इथे ही दुर्जनांकडे बेकायदा शस्त्रे आहेतच की. परवान्यावाचून त्यांचे काहीच अडत नाहीय. सज्जनांचीच कुचंबणा होते. ते प्रत्येकवेळी माघार घेतायत म्हणून जिवंत राहतायत इतकेच. मी स्वत: कित्येकवेळा समोरच्याची चूक असूनही त्यांच्याशी प्रतिवाद करत नाही, इथे भर गर्दीत खिशात revolver घेऊन लोक हिंडतात, जे की बिहार शरीफ येथून २५,०००/- रुपयात आणलेले असते. सज्जनांच्या हाती शस्त्रे आली की ते दुर्जनांचा तिथल्या तिथे प्रतिकार करू शकतील. कदाचित त्यामुळे सुरूवातीला काही काळ, आता आहे त्यापेक्षा रक्तपात वाढेल. पण काही काळच कारण त्या नंतर दुर्जनांना जाणीव होईल की आपल्या हाती शस्त्र आहे तसे समोरच्याच्या हातात देखील... आणि आपण जर त्याच्यावर अन्याय करायला लागलो तर तो ही काही गप्प बसणार नाही. त्यामुळे पुढे एक काळ असाही येऊ शकेल की सर्वांच्याच पाशी शस्त्रे असतील आणि सर्वांनाच त्याची जाणीव असेल व त्यामूळे कुणीच त्याचा वापर करणार नाही. (आज जसे की भारत व पाक दोघांकडे अण्वस्त्रे आहेत व त्यामुळेच कोणीच त्याचा वापर करत नाही. एकट्या पाककडे असती तर काय झाले असते?)

दुसरं असं की तुम्ही जो अजमल कसाबचा मुद्दा मांडलाय त्यावरही माझं मत तुम्हाला ठाऊक असेलच (कारण तुमच्याच संकेतस्थळावर मांडलंय. तरी नसल्यास पुन्हा वाचावे - http://mimarathi.net/node/4186).

इथेही माझे विचार स्पष्ट आहेत. अशी प्रकरणे हाताळण्यात सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरतेय तिथे सामान्य नागरिकांकडून कसली त्यागाची अपेक्षा करताय?

त्या हल्ल्यात CST वर सामान्य नागरिक मारले गेले त्या बिचार्‍यांवर अचानक हल्ला झाला होता. पण त्यानंतर मी ज्या ९ पोलिसांचा उल्लेख केलाय त्यांना हे ठाऊक होतं की देशावर हल्ला झालाय. ते अचानक हल्ल्याचे बळी नक्कीच नाहीयेत. संदर्भ आता तरी समजला असेलच आणि माझा मुद्दाही. जिथे ON DUTY लढणारा (किंवा लढण्यासाठी शस्त्रसज्ज होऊन निघालेला म्हणा हवं तर) पोलीस मारला गेला तरी त्याची विधवा पत्नी यंत्रणेला दोष देतेय मग सामान्य नागरिक जर ह्यात नाहक गोवला गेला तर त्याने / त्याच्या कुटुंबियांनी कुणाला दोष द्यायचा.

<< अतेरिकी तुम्हाला सांगत अथवा कॉल करून येत नसतात.. व गोळीतर कधीच नाही.>> ह्या तुमच्या मुद्याचा प्रतिवाद असा की अतिरेकी अचानक देखील प्रकट होत नाहीत. सीमेवर आपले जवान काय करीत असतात? त्यांच्या हलगर्जीपणामुळेच अतिरेकी आत येतात. अतिरेकी आत येतात (तेही साठ तास लढता येईल इतक्या शस्त्र व दारुगोळ्यासह) यात आपल्या सरकारी यंत्रणेतील एकाचाही दोष नाही हे कसे काय शक्य आहे?

<< अतिरेक्यां बरोबर तडजोड नकोच ...... मग कोणीही ओलीस असला तरी हरकत नाही >> Theoritically हे बरोबर आहेच, पण मग तशी वेळच का येऊ द्यावी म्हणतो मी? आपली जनता अतिरेक्यांच्या तावडीत सापडायला नको इतकी सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी सरकारचीच आहे की? (एखादा नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालायला स्वत:हून restricted area त गेला तर गोष्ट वेगळी पण भर गर्दीच्या शहरात अतिरेकी जनतेला वेठीस कसे धरू शकतात? नेत्यांना कशी बरोबर सुरक्षितता पुरविली जाते? प्रसंगी त्याकरिता इतरांची गैरसोयही केली जाते. नेते बरे अतिरेक्यांच्या तावडीत सापडत नाहीत? मग जनतेनेच का सापडावे?)

जर देशाचं शासन तितकंच स्वच्छ, पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त असेल ना तर या देशातला एकूण एक (माझ्यासकट) सामान्य नागरिक देशाकरिता प्राण त्याग करायला तयार होईल. आहे अशा परिस्थितीत मात्र मी प्राण च काय पण देशासाठी कवडीसुद्धा अर्पण करणार नाही.

मी देशाकरिता हसत हसत मरायला तयार आहे असं म्हणणं फार सोपं असतं. प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसल्यावर कसोटी लागते. प्रत्येक सजीवात जगण्याची प्रचंड आसक्ती असते. ती नाकारण्यात काय अर्थ आहे? मी प्रामाणिकपणे सांगतो की हे जीवन सुंदर आहे आणि ते जास्तीत जास्त जगायला मला निश्चितच आवडेल. आहार आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करून दीडशे वर्षे जगता येइल असं माझं नियोजन आहे. इतकं जगल्यावरदेखील मरताना मला फार वाईट वाटेल. माझे हे विचार कुणालाच पटले / आवडले नाहीत तरी हरकत नाही पण निदान आज तरी आपलं हे सुंदर जीवन कुणाकरिता तरी त्यागावं असं (व्यक्ती, संस्था, समाज, देश) मला दिसत नाहीय. परिस्थिती बदलली तर माझे विचारही बदलतील.

आणि चित्रपटांचं म्हणाल तर तुम्हीच कोहराम (अमिताभ, नाना) पाहा. "आम्ही अतिरेक्यांच्या कारवाईत शहीद व्हायला तयार आहोत" यासारख्या भंपक वल्गना करणारे प्रत्यक्षात कसे असतात ते त्यात दाखविले आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे.

(अवांतर:- मी जून २००९ ते सप्टेंबर २००९ मध्ये सल्लागार म्हणून काम केले होते तेव्हा माझा रूपये १३,०००/- इतका TDS कापला गेला. त्यानंतर तो आवश्यक त्या सर्व कागद्पत्रांची पूर्तता करूनही अजूनदेखील मिळाला नाहीय. किमान चार महिने वाट पाहा असं उर्मट उत्तर ऐकायला मिळतंय. दुसरीकडे माझे एक व्यावसायिक मित्र, ज्यांना त्यांचा आगावू कर भरावा लागतो, त्यांनी त्यात फक्त आठ दिवस उशीर केला तर त्यांना प्रचंड दंड भरावा लागला. मला फक्त विरोधाभास दाखवून द्यायचाय की सरकारचं जनतेप्रती काहीच कर्तव्य नाहीय असं ही शासन यंत्रणा पदोपदी वागतेय. त्याचवेळी नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांना कठोर शिक्षा आहेत. इथे नागरिक कर्तव्यपूर्ती करतायत तेच खूप आहे. ह्या बोनस त्यागाची अपेक्षा सरकार कुठल्या तोंडाने ठेवतंय?)


At Least I Think So. Thats all.
16/2 विशाल कुलकर्णी: <<९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते, >>>
चेतनजी, याचा संदर्भ द्याल का जरा ! मला पण उत्सुकता आहे.... (माझ्या मनात काही अंदाज आहेत पण ते तुमचे उत्तर आल्यावरच मांडेन !)
16/2 CHETAN GUGALE: २६/११ ला हल्ला सुरू झाला आणि तासाभरात सार्‍या देशाला दूरचित्रवाहिन्यांवरून ते समजले. त्यानंतर तीन प्रमुख पोलिस अधिकारी आणि इतर पोलिस असे मिळून त्या अतिरेक्यांशी लढायला निघाले. त्यातल्या एकाला तर सर्वांनीच चिलखत घालून सज्ज होऊन निघताना दूरचित्रवाणीवरून पाहिलंय. (इतकं सविस्तर वर्णन करण्याचा उद्देश हा की ते पूर्णत: सावध होऊन लढायला निघाले होते हे त्यांना आणि सर्वांनाच ठाऊक होतं.) प्रत्यक्ष लढायला सुरूवात करण्यापूर्वीच त्यांच्यावर रस्त्यात गोळीबार झाला आणि त्यात ते ठार झाले.


आता त्यांच्यापैकी एकाच्या विधवा पत्नीचे म्हणणे असे आहे की पोलीस मुख्यालयातून राकेश मारिया यांनी चूकीच्या सूचना दिल्यानेच हे पोलिस अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडले. या आरोपात काय तथ्य आहे? अशा आरोपांनी व्यथित होऊन मारिया राजीनामा द्यायच्या बेतात होते. शेवटी सरकारनेच त्यांची समजूत काढली.

ज्याप्रमाणे सीएसटीवर झालेला हल्ला अचानक होता त्याचप्रमाणे या पोलिसांवर झालेला हल्लाही अचानक असू शकत नाही का? मारिया यांचा त्यात काय दोष? खरे तर एकदा शहरावर हल्ला झालाय असे समजल्यावर तो अमूक एका भागातच झालाय आणि ही पोलीस टीम त्या भागात जाईपर्यंत त्यांच्यावर इतरत्र कुठेही हल्ला होणारच नाही (किंवा होणार असेल तर पोलीस मुख्यालयाने त्यांना त्याविषयी अगोदरच सतर्क करावे) अशी काही या बाईंची समजूत आहे का? त्यांच्यावर ज्या परिसरात हल्ला झाला तेथे अतिरेकी असल्याची माहिती मुख्यालयाने त्यांना का दिली नाही असा मुख्य आक्षेप मांडत या बाईंनी थेट एक पुस्तकच लिहीलेय.

माझं एवढंच म्हणणं आहे की इतक्या संवेदनशील हल्ल्याला तोंड द्यायला अत्याधूनिक शस्त्रांसह सज्ज होऊन निघालेला (सज्ज होऊन निघालेला हे तीन शब्द अधिक महत्त्वाचे) अधिकारी अतिरेकी हल्ल्यात मारला गेला तर त्याची विधवा पत्नी देखील त्याकरिता शासकीय यंत्रणेला जबाबदार धरते. तर मग एखादा नि:शस्त्र सामान्य नागरिक जेव्हा काहीच कल्पना नसताना अतिरेक्यांच्या तावडीत सापडतो तेव्हा त्याने देशाकरिता खुशाल आपले बलिदान द्यावे अशी अपेक्षा ठेवणे हा समाजाचा दुटप्पी न्याय नाहीय का?
16/2 Raj Jain: चेतन तुम्ही ते पुस्तक वाचले आहे का ?
हा सर्वात आधी प्रश्न.. तीने मनात आले म्हणून लिहले नाही आहे.. तीने तेथे काही पुरावे दिले आहेत, माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेले... असो.
तुमचा हा दृष्टीकोन पटला नाही...
16/2 CHETAN GUGALE: << तीने मनात आले म्हणून लिहले नाही आहे.. तीने तेथे काही पुरावे दिले आहेत, माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेले... >>

मी त्या बाईंनी काही बेकायदेशीर केले आहे असे म्हंटलेच नाहीय. त्यांना त्यांचा आक्षेप नोंदवायचा पूर्ण हक्क आहेच. त्या पाहिजे तर न्यायालयात देखील जाऊ शकतातच की.... त्यांचे पती कायद्याच्या सेवेत होते म्हंटल्यावर त्यांचा देशाच्या न्यायसेवेवर विश्वास असणारच. फक्त त्यांनी जर अशा प्रकारे पुस्तक लिहून आपले आक्षेप मांडलेले समाजाला चालते तर सामान्य नागरिकाच्या कुटुंबियांनी आमच्या ओलीस ठेवलेल्या नातेवाईकाला सरकारने सुखरूप परत आणावे अशी अपेक्षा केल्यास का चालत नाही? हाच माझा मुख्य मुद्दा आहे. कृपया समजून घ्या.
16/2 CHETAN GUGALE: मी एक सामान्य नागरिक म्हणून या सार्वभौम राष्ट्रात जिवंत राहण्याच्या अतिशय मुलभूत अधिकाराची अतिशय रास्त मागणी करतोय. त्याकरिता लागणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा, बेकार भत्ता / नोकरीची हमी, अशा कुठल्याही गरजा पूर्ण करा हे देखील सरकारला सांगत नाहीय. माझ्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गरजांपैकी फक्त एक गरज म्हणजे सुरक्षितता मला पूरवा एवढीच माझी सरकारकडून अपेक्षा आहे. तीदेखील केली नसती पण पूर्वीच्या काळी जसे नागरिक तलवार, इत्यादी शस्त्रे बाळगत होते, तसे कायद्याचे राज्य आल्यावर आता बाळगता येत नसल्याने (शांतताप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सत्ताधारी खासदाराचा अभिनेता पूत्र असतो तर मात्र एके ५६ बाळगता आली असती नक्कीच) ही जबाबदारी सरकारवर आहे असे मानतो.

एवढ्या एकाच कारणाने मी तुमच्यासारख्या बुद्धिवाद्यांच्या रोषाचा धनी ठरत असलो तरी माझे हे विचार मी ठामपणाने मांडीनच कारण मला पक्के ठाऊक आहे की काही मूठभर तथाकथित विचारवंत सोडले तर प्रामुख्याने सामान्य जनतेचे असेच विचार आहेत.

याचा धडधडीत दाखला म्हणजे २००० साली अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारला घातलेले साकडे "काहीही करा पण त्या प्रवाशांना सोडवा". त्यात काहीच चूक नाहीय. प्रत्येकाला आपले प्राण प्रिय असतातच. ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.
16/2 Raj Jain: >>ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.

चर्चा समाप्त :)
16/2 CHETAN GUGALE: सर्व भावनिक गोष्टी बाजूला ठेवून वस्तूनिष्ठ विचार करू. समजा तुम्ही म्हणता तसे अतिरेक्यांनी तीन चारशे नागरिकांना अपहृत केल्यानंतर त्यांच्या मागण्या धुडकावून नागरिकांचा बळी देण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला तरी त्याने नेमके काय साध्य होणार?

जे इतके नागरिक मरतील त्यांच्या नातेवाईकांच्या मनात कुठेतरी सरकारविषयी अढी निर्माण होणारच ना. त्यापेक्षा मुत्सद्देगिरीने वागावे (आणि सरकारने तसेच केले). अतिरेकी म्हणजे कुणी चोर, दरोडेखोर नसतात राजे. तो एक असंतुष्ट लोकांचा गट असतो. त्यांच्या काही मागण्या असतात. त्यातल्या काही न्याय्य किंवा रास्त आहेत असे मानणार्‍या इतर अनेक बाहेरील लोकांचा समज असतो. अशा लोकांच्या आर्थिक पाठिंब्यावरच अतिरेकी कार्यरत राहतात. अतिरेक्यांना प्राणाची (इतरांच्या आणि स्वत:च्याही) पर्वा नसते. ते जितके सहज मारायला तयार असतात, तितकेच सहज मरायलाही.

त्यांच्याशी असे भावनिक होऊन लढता येत नाही. त्यांचा पाठिंबा घालविणे हे सर्वात आवश्यक असते. आर्थिक रसद तोडणे हा देखील एक महत्त्वाचा उपाय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायाचे विश्व स्थापन करणे ज्यात कोणी अतिरेकी पैदा होणारच नाही.
16/2 महेंद्र .: चेतन,
धर्माधिकारी सरांचे इस्रायल, आणि जपान वरचे भाषण जरूर वाचा. माझ्या कडे आहे, आणि मी ते फोरशेअर्ड वर अपलोड करतोय लवकरच..
16/2 Raj Jain: तुम्ही अतेरिकी व नक्षलवाद यात गोंधळ करत आहात.. अतेरिकी म्हणजे ज्यांनी देशा विरुध्द युध्द पुकारले आहे ते... !

* आता परत एक पुस्तक मी पण सुचवतो अस्वस्थ दशकाची डायरी... काय ची उत्तरे काही प्रमाणात त्यात मिळतील..
* मी शक्यतो धर्मावर जात नाही, पण तुमचे हे विचार हे आपल्या धर्मामुळे तयार झालेले आहेत.. व माझे मत जर मी येथे लिहले तर धार्मिक वाद रंगेल विषय सोडून :)
* समोरच्याची मते मान्य नाहीत म्हणून गळा काढणे अथवा ढोंगी म्हणणे सर्वांर्थाने मला पटले नाही.
वादाला प्रतिवाद करा, पण व्यक्तीला नाही हे माझे नेहमीचे तत्त्व आहे..
16/2 CHETAN GUGALE: <<< >>ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.

चर्चा समाप्त :) >>>>


माझ्या विधानाचा राजेंना राग आलेला दिसतोय. पण एक लक्षात घ्या खरोखरच कोणी बलिदान देत असेल तर माझा त्याला सलाम आहे. नीरजा भानोत या हवाई सुंदरीने काही वर्षांपूर्वी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवित त्याबदल्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात स्वत:चा बळी दिला होता.

नीरजा विषयी मला अतीव आदर आहे. पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त? ती महान आहे (होती म्हणत नाही - तो तिचा अपमान ठरेल). पण अशा पद्धतीने महान व्हायची सक्ती तुम्ही प्रत्येकावरच करू शकत नाही.

कोणी सामान्य असूच नये का?
16/2 Raj Jain: >>पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त?

मी देशासाठी मेल्यावर मला देश काही तरी देईल / माझ्या परिवाराला काही तरी देईल हे ठरवून कोणी मरत नाही चेतन.. ! त्यांना दिलेला सन्मान मध्ये देशाने त्यांच्या शहादत बद्दल व्यक्त केलेली भावना असते...
16/2 आ का Anand Kale: नीरजा विषयी मला अतीव आदर आहे. पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त?

चेतन तु दोन्ही बाजुने बोलतो आहेस...
16/2 CHETAN GUGALE: << पण तुमचे हे विचार हे आपल्या धर्मामुळे तयार झालेले आहेत.. >>

ह्याचा काहीच संबंध नाही. एक तर आपण दोघे एकाच धर्माचे आहोत. दुसरे म्हणजे मी धार्मिक विचारांचा अजिबात नाही (आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीही नाही).

<< समोरच्याची मते मान्य नाहीत म्हणून गळा काढणे अथवा ढोंगी म्हणणे सर्वांर्थाने मला पटले नाही.>>>

एखाद्याने मी मरायला तयार म्हंटले तर मी समजू शकतो राजे पण त्याने त्याचवेळी इतरांवरही तीच सक्ती केली तर मी त्याला ढोंगी म्हणतो.
16/2 Raj Jain: समज अशी वेळ आली सक्ती करन्याची... तर मी ती सक्ती नक्की करेन, मग याला ढोंगी म्हण अथवा काही ही..
16/2 CHETAN GUGALE: आका मी दोन्ही बाजूंनी बोलत नाहीय.

मुद्दा समजून घे. एखादी व्यक्तीने स्वेच्छेने अशी महान होऊ शकते. संपूर्ण जनतेवर अशा महानतेची सक्ती करणे चूकीचेच आहे असे माझे म्हणणे आहे.
16/2 Raj Jain: देश प्रेम ही दाखवून देण्याची वस्तू नाही आहे.. ती रक्तात असते.. आपल्या मातीत असते.. जीचे अन्न खातो तीच्या उपकाराबद्दलची परतफेड असते.. त्यासाठी आधी मुळातून विचार करणे गरजेचे आहे..
16/2 CHETAN GUGALE: राजे तुम्ही अशी सक्ती करण्याची भाषा बोलताय म्हणूनच आज देशात राजे शाही नाहीय. लोकशाही आहे.
16/2 Raj Jain: वाक्य पुर्ण वाच.. जर अशी वेळ आली की .... !!!
16/2 आ का Anand Kale: आता अतिरेक्याने ओलिस ठेवले याला तु सरकारने त्याला जबरदस्तीने अतिरेकांच्या हवाली केलं की यालाच पकडा म्हणुन असं म्हणतो आहेस???
16/2 CHETAN GUGALE: अरे सरकारने जबरदस्तीने अतिरेक्यांच्या हवाली केलं असं मी कुठे म्हंटलंय? पण ज्या मुलूखात मी सरकारी कायद्यांमूळे नि:शस्त्र हिंडतोय. त्या मुक्त मुलुखात कोणी शस्त्रांच्या धाकाने मला ओलीस ठेवलं तर मला सोडविण्याची जबाबदारी कोणाची?

अर्थातच ज्यांनी मला शस्त्र बाळगण्यापासून रोखलं (व जसा त्यांचा अधिकार होता) त्यांचीच ना..
16/2 CHETAN GUGALE: Authority & Responsibility should be balanced.

पोलिस मला शस्त्र बाळगण्यापासून जर अधिकाराने रोखू शकतो तर त्याच भागात इतर कोणाच्या शस्त्राने मी बाधित होणार नाही हे पाहण्याची जबाबदारीही त्याचीच.
16/2 Raj Jain: >>मला सोडविण्याची जबाबदारी कोणाची?

आता तुमच्या मताप्रमाणे उत्तर देतो... जबाबदारी नाही आहे.. नैतिकता म्हणून तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करणे सरकार कडून अपेक्षित आहे पण तुम्हाला ओलिस ठेऊन मागीतलेल्या मागण्या तुमच्या जिवनापेक्षा जास्त महाग पडत असेल ( उदा. त्यांनी दुसरा कुठला तरी अतेरेकी सोडावयास सांगितले, जो अनेक नरसंहार करू शकतो) तुमचा बळी देणे देशहिताचे ठरेल.. मग तुम्ही देशाच्या नावाने शंख करा अथवा शिव्या शाप द्या... व्यक्ती पेक्षा देश महत्त्वाचा.
16/2 आ का Anand Kale: राजशी सहमत... चेतन तुझा मुद्दा पटतोय.. पण योग्य निर्णय हाच आहे..
16/2 CHETAN GUGALE: राजे आजपर्यंत या देशात अनेक वेळा "अशी वेळ" आलीय पण अजून तरी इथे सक्तीची सैनिक भरती झालेली नाहीय.
16/2 Raj Jain: कारण, देशप्रेमापॊटी सैन्यात जाण्या-यांची संख्या खूप आहे.. . म्हणून.
16/2 CHETAN GUGALE: << पण तुम्हाला ओलिस ठेऊन मागीतलेल्या मागण्या तुमच्या जिवनापेक्षा जास्त महाग पडत असेल ( उदा. त्यांनी दुसरा कुठला तरी अतेरेकी सोडावयास सांगितले, जो अनेक नरसंहार करू शकतो) तुमचा बळी देणे देशहिताचे ठरेल.. >>

आमची किंमत तुम्ही कशी ठरविता राजे?
16/2 आ का Anand Kale: कॉमन सेंस आहे... तुझ्या जिवनाने जे बाधित होणार त्यापेक्षा कितितरी लोक त्या अतिरेक्याला सोडल्याने होणार आहेत...
16/2 Raj Jain: >>आमची किंमत तुम्ही कशी ठरविता राजे?

मी किंमत ठरवत नाही आहे.. व तो माझा अधिकार नाही, ज्याच्याकडे ते अधिकार असेतील त्यावेळी ते ठरवतील....
16/2 CHETAN GUGALE: << देशप्रेमापॊटी सैन्यात जाण्या-यांची संख्या खूप आहे.. . म्हणून>>

निश्चितच मी मान्य करतो. तो त्यांचा निवड अधिकार ही आहे. तसाच शांतताप्रिय नागरिक म्हणून जगणे हा इतरांचा निवड अधिकार आहे.
16/2 Raj Jain: जर दुसरा कोणी तुमच्यावर अशांतता लादत असेल तर ?
व स्वसंरक्षणात जर तुम्ही एकाद्याची हत्या केली तर ती आपल्या देशात देखील माफ आहे..

तुम्ही शब्दाला शब्द वाढवत आहात राव.. !
16/2 Raj Jain: चेतन,
रिड बिटवीन द लाईन्स !!!
एवढेच म्हणेन..
आमची आता खरोखर रजा या बझ वरून.. !!!
16/2 CHETAN GUGALE: <<< जर दुसरा कोणी तुमच्यावर अशांतता लादत असेल तर ?
व स्वसंरक्षणात जर तुम्ही एकाद्याची हत्या केली तर ती आपल्या देशात देखील माफ आहे..>>>

मला देखील नेमके हेच तर म्हणायचे आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार आधी द्या. त्याकरिता आवश्यक ती शस्त्रे आम्हाला द्या. लढता लढता जर आमचा बळी गेला तर निदान मरताना समाधान तरी लाभेल.

ओलिस म्हणून मरणे किती वाईट याची तुम्हाला काहीच कल्पना नाहीय. ते लोक असा सहज मृत्यू देत नाहीत. एक एक अवयव तोडून मारतात. विकृत छळ करतात.

माझ्या देशाचा कायदा मला शस्त्र बाळगू देत नसेल, अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्यावर तुमच्या सारखे बुद्धिवादी माझी सुटका होऊ देणार नसतील तर माझी एकच मागणी आहे राजे आणि आका..


Common Sense असेल तर ओळखू शकाल...
16/2 CHETAN GUGALE: व्यक्तिगत बोलू नये असा संकेत असला तरी -
इथल्या बुद्धिवाद्यांच्या युक्तिवादावरून हे सहज जाणवतंय की त्यांचा कुठलाही जवळचा नातेवाईक आतापर्यंत ओलीस ठेवला गेला नसावा. कारण ओलिसांच्या नातेवाईकांच्या दृष्टीकोनातून कोणीच बोलत नाहीय.

माझा पूतण्या जवळपास दोन महिने अतिरेक्यांच्या नाही तरी सोमालियातील समुद्री चाच्यांच्या ताब्यात होता. अशा वेळी काय परिस्थिती निर्माण होते हे मला चांगलेच ठाऊक आहे.

बाकी असल्या अनुभवाशिवाय गप्पा ठोकण्यात काहीच अर्थ नाहीय.
16/2 विशाल कुलकर्णी: मला देखील नेमके हेच तर म्हणायचे आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार आधी द्या. त्याकरिता आवश्यक ती शस्त्रे आम्हाला द्या. लढता लढता जर आमचा बळी गेला तर निदान मरताना समाधान तरी लाभेल. >>>>

तुमच्या सर्व मतांबद्दल योग्य तो आदर बाळगुन एक विचारावेसे वाटते चेतनजी. सरसकट हत्यारे बाळगण्याची परवानगी देणे कितपत योग्य आहे. सर्वसामान्य माणुस आणि समाजकंटक यांच्यातील फ़रक कसा काय स्पष्ट होणार, अजुन तरी असे काही ओळखण्याचे कुठलेही साधन नाहीये. अशा परिस्थितीत चुकीच्या हातात हत्यारे पडणे किती धोकादायक होवु शकते याची तुम्हाला कल्पना असेलच. :)
16/2 CHETAN GUGALE: << सरसकट हत्यारे बाळगण्याची परवानगी देणे कितपत योग्य आहे. >>

मी वर (म्हणजे बरेच वर कारण ही चर्चा आता खूपच लांबलीय) म्हंटले आहेच की चूकीच्या लोकांनी बेकायदा मार्गांनी शस्त्रे जमविली आहेतच. गरज आहे ती शांतताप्रिय नागरिकांच्या हाती शस्त्रे मिळण्याची.

परवाना काढून शस्त्रे बाळगल्यास आणि प्रत्येक गोळी नोंद करून दिल्यास व पुन्हा तिचा हिशोब मागितल्यास फारसा गोंधळ होणार नाही. उलट बेकायदा बिहारी शस्त्रांच्या साहाय्याने इथे जी गुंडगिरी चालते. तिला आळा बसेलच...


आणि हेही शक्य नसेल तर जी माझी शेवटची मागणी मी आका आणि राजे यांना ओळखायला सांगितलीय ती तुम्ही ओळखली असेलच ना?
16/2 CHETAN GUGALE: ही चर्चा ह्या भाग घेतलेल्यांव्यतिरिक्त अजूनही काही लोक वाचतायत. त्यातल्याच एका सन्माननीय वाचकाने पाठविलेला हा लेख आपण सर्वांनी अवश्य वाचावा.

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQOGE5MGFhMDItMjdkMC00ZDMzLWJkYmItNmRlNDQzY2QwMzM4&hl=en
16/2 CHETAN GUGALE: महेंद्र जी,

आपले अतिशय धन्यवाद. (बझ्झ डिलीट न केल्याबद्दल व ही चर्चा चालु दिल्याबद्दल). धर्माधिकारी साहेबांचे भाषण अपलोड केल्यावर त्याची लिंक इथे जरूर द्यावी ही विनंती.

आपला आभारी,

चेतन
17/2 Gaurav Deshpande: धन्यवाद माहिती बद्दल. मी पुण्यात म्हात्रे पुलाशेजारच्या सोसायटी मधेच राहतो.जाता येता हुतात्मा रवींद्र म्हात्रे पूल हे शब्द नजरेस यायचे मात्र हि माहिती कधीच नव्हती. राज्यकर्त्यांचे धोरण हे नेहमीच बुचकळ्यात टाकते. अफजल गुरु ला फाशीवर केवळ लटकावण्यासाठी एवढा वेळ घेणारे लोक काही बाबतीत फार कार्यक्षम भासतात !!
19:32 CHETAN GUGALE: A must listen Audio regarding this discussion.

Listen What She Says


Viewing is disabled to keep the effectiveness of dialogues.

View of a common citizen when her husband is kidnapped by the Terrorists. Listen her last sentence. Its very important. She says, "Army is responsible for the security of her husband and it is their duty to get him back safe and sound"

Everyone must be totally agree with her statement. (Thats why this movie was a super hit at its time.)
20:07 रोहन चौधरी: इंदिराजीचे व्यक्तिमत्व खूपच गुंतागुंतीचे होते... पण त्यांनी काही धडाडीचे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले. शास्त्री, पटेल आणि इंदिराजी नंतर काँग्रेस म्हणजे............ असो.. बांगलादेशचा निर्णय देखील असाच एक... वरची सर्व चर्चा वाचली... त्यास पुन्हा सुरू करीत नाही... :)
आणि सर्वात शेवटी वर उल्लेखित त्या गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील संवाद ज्यात नायिका ठामपणे आपलं मतप्रदर्शन करतेय.



ती स्पष्टपणे कर्नलला म्हणतेय की सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने तुमच्यावर (लष्करावर) सोपवलीय.  आता बोला, मी काय वेगळं म्हणत होतो? तरी सगळे माझ्या विरोधात गेलेच ना? (आणि हाच चित्रपट लोकांनी पैसे खर्च करून थेटर हाऊसफुल्ल करून बघितला.  याला म्हणतात विरोधाभास.)

Friday, 14 January 2011

आयडीअल चा खरा अर्थ

सर्वसाधारणपणे आपण ज्याला आपली बोली भाषा म्हणतो ती छापील पुस्तकी भाषेहून बरीच वेगळी असते.  त्यात दुसर्‍या भाषेतील शब्दांचा मुक्त वापर तर असतोच पण अनेकदा ते शब्द बिनदिक्कतपणे चूकीच्या अर्थाने वापरले जातात.

असाच एक इंग्रजी शब्द म्हणजे आयडिया (IDEA).  या शब्दाचा मराठीत अर्थ होतो कल्पना, पण आपल्यापैकी अनेक जण हा शब्द चक्क युक्ती या अर्थाने बोलताना वापरतात.  लोकांनी अशा वेळी योग्य मराठी शब्द वापरावा किंवा ते जर जमणार नसेल व इंग्रजी शब्दच वापरायचा असेल तर ट्रिक (Trick) हा शब्द वापरावा या अर्थाचे मार्गदर्शनपर लिखाण यापूर्वीच अनेक विद्वानांनी केले आहे.  उदाहरणादाखल राधा मराठे यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील माय मराठी या सदरात २९ एप्रिल २००६ रोजी लिहिलेला हा लेख.  या लेखातल्या बाराव्या परिच्छेदात त्यांनी या आयडिया / युक्ती शब्दांच्या चूकीच्या वापराविषयी अतिशय विस्ताराने लिहीले आहे.

या आयडियाचेच अपत्य असलेला एक शब्द म्हणजे आयडीअल (Ideal).  या शब्दाचाही आपल्याकडे बोलताना सढळ वापर केला जातो.  कुणी जर अगदी सरळ, अजिबात गैरमार्गांचा अवलंब न करता वागायची भाषा करू लागला तर त्याला तिथल्या तिथे परावृत्त करताना सुनावले जाते "उगाच आयडीयल गोष्टी बरळू नको, प्रॅक्टीकल काय असेल ते बोल".  या ठिकाणी त्या परावृत्त करणार्‍या व्यक्तीला प्रॅक्टीकलचा अर्थ वास्तविक किंवा वास्तवातले असा अपेक्षित असतो तर त्याचवेळी आयडीअल चा अर्थ काल्पनिक किंवा प्रत्यक्षात नसणारे असा अपेक्षित असतो.

आयडीअल म्हणजे आदर्श असा एक अर्थ शब्द कोशात दिलेला आहे पण त्या अर्थाला आयडीअल हा शब्द ज्या आयडीया या शब्दा पासून तयार झालाय त्या शब्दाच्या अर्थाचा आधार नाहीय.  त्याचवेळी शब्दकोशात आयडीअल चा अजून एक अर्थ काल्पनिक असा आहे आणि या अर्थाला आयडियाच्या अर्थाचा तार्किक आधार देखील आहे. 

विज्ञानात मुख्यत्वेकरून आयडीअल हा शब्द काल्पनिक या अर्थानेच वापरला जातो.  विज्ञानातील बर्‍याच संकल्पना या केवळ कल्पनेतच असू शकतात, प्रत्यक्षात असू शकत नाहीत. उदाहरणार्थ :- आयडीअल व्होल्टेज सोर्स (ज्याचा रेझिस्टन्स इन्फाईनाईट आहे) किंवा आयडीअल करंट सोर्स (ज्याचा रेझिस्टन्स झीरो आहे), आयडिअल मशिन / इंजिन (ज्यांची इफिशिअन्सी १०० टक्के आहे), इत्यादी.

व्यवहारात मात्र आयडीअल हा शब्द जास्तकरून आदर्श म्हणजेच संपूर्णत: दोष विरहीत, शुद्ध या अर्थाने वापरला जायला हवा.  आपल्याकडे मात्र लोकांनी बोली भाषेत आयडीअल हा शब्द अशा काही पद्धतीने वापरलाय की त्यामुळे आयडीअल असं काही जगात असूच शकत नाही हेच ऐकणार्‍याच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न चाललाय असं वाटू लागलंय.  विशेषत: भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलायचं तर भ्रष्टाचार जिथे होत नाही असं एखादं सरकार, एखादा प्रशासकीय विभाग, अशी एखादी संस्था, एखादा व्यवसाय किंवा आता तर आयुष्यात कधीच भ्रष्टाचार केला नाही अशी एखादी व्यक्ती अस्तित्त्वात असूच शकत नाही याबाबत आपल्या मनात दृढ विश्वास होत चाललाय.  या संदर्भात आयडीअल चा अर्थ आपण आदर्श नाही तर केवळ काल्पनिक च असू शकतो यावर ठाम होत चाललो आहोत.

आयडिया हा शब्द चूकीच्या अर्थाने वापरणारे आपण आयडीअल हा शब्द (शब्दकोशाच्या दृष्टीने) बरोबर अर्थाने वापरत असलो तरी त्यामागची आपली मानसिकता बरोबर आहे असे आपल्याला खरंच वाटते का?