कुठल्याही वाहनचालकाने उलट दिशेने वाहन चालवू नये याकरिता एक सुलभ उपाय सुचवित आहे.
खाली डकविलेल्या रेखाचित्रानुसार महामार्गावर ठराविक अंतरावर नॉन रिटर्न
जर्नी रॅम्प्स उभारावेत. म्हणजे रस्त्याच्या रुंदीइतकी रूंद, अर्धा ते
पाऊण इंच जाडीची प्लेट साधारण दोन फुट अंतरापर्यंत ३० अंशाच्या कोनात उचलली
जाईल अशा पद्धतीने जाड स्प्रिंग्सच्या साहाय्याने रस्त्यावर बसवावी. ज्या
दिशेने वाहन प्रवास करणे अपेक्षित आहे त्या दिशेने ती खालून वर उचलली जाईल
अशी तिची रचना असावी. साधारण १०० किग्रॅ वजन तिच्यावर पडले म्हणजे ती
दाबली जाऊन रस्त्याच्या पातळीत सपाट होईल अशा स्प्रिंग्ज असाव्यात. म्हणजे
सरळ दिशेने जाणारे वाहन त्यावर चढले की ती प्लेट दाबली जाऊन रस्त्याच्या
पातळीत येईल व वाहन सहज पार होईल. याउलट विरुद्ध दिशेने जाणारे वाहन या
प्लेटसमोर आले की स्प्रिंगमुळे फुटभर वर आलेली ही प्लेट अडथळा बनून या
वाहनाला अटकाव करेल. वाहन विरुद्ध दिशेने प्रवासच करू न शकल्याने संभाव्य
अपघात टळतील.
हक्काची मार्गिका कित्येक तास वाहतूक खोळंब्यामुळे बंद असणे यामूळे विरुद्ध
मार्गिका वापरली जाणे ही परिस्थितीही वाहनचालकांवर न यावी हे देखील महत्त्वाचे
आहे. तासाला किमान १५ किमी तरी पुढे जाता यायला हवे इतपत सर्वच रस्ते
मोकळे आणि खड्डेमुक्त असावेत. जर अर्धा / एक किमी कापायला तीन चार तास
रांगेत उभे राहावे लागले तर तहान, भूक व इतर शारिरीक गरजांनी त्रस्त होऊन
वाहनचालक नाईलाजाने विरुद्ध मार्गिका वापरणारच ही सामान्य बाबदेखील विचारात
घ्यायला हवी.
चांगली आयडिया
ReplyDeleteधन्यवाद अविनाशजी.
ReplyDelete